मुख्य बातम्या

रेल्वे सुरू करा अन्यथा….. ; मनसेच्या आंदोलनाला मुंबईच्या डबेवाल्यांचा बिनशर्त पाठिंबा !

0

सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसेनं सविनय आंदोलन पुकारले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी गनिमी कावा करत लोकलने प्रवास करून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मुंबई डबेवाला असोशिएशनने बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मनसेनं आज सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला मुंबईच्या डबेवाल्यांनीही परवानगी दिली आहे. अनेक ऑफिसं सुरू झाली असल्यामुळे डबे पोहोचवण्यासाठी रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी डेबेवाल्यांनीही केली होती.
इतकंच नाही तर मनसेने डबेवाल्यांच्या मागणीला उचलून घेतल्यामुळे मनसेचे आभारही डबेवाल्यांकडून मानण्यात आले आहेत. दोन महिन्यापूर्वी मुंबई डबेवाला असोशिएशन यांनी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती की लोकल सेवा बहाल करा अन्यथा मुंबईच्या डबेवाल्यांची जेवणाचे डबे पोहचवण्याची सेवा अत्यावश्यक सेवा मानून डबेवाल्याला लोकलने प्रवास करू देण्यात यावा. परंतु, दोन महिने झाले तरी रेल्वे प्रशासनाने कोणताच निर्णय घेतला नाही.
ना लोकल सेवा बहाल केली ना डबेवाल्यांची सेवा अत्यावश्यक मानून लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली. मुंबई हळूहळू पुर्व पदावर येत आहे. काही शासकीय, निमशासकीय, कार्पोरेट कार्यालये चालू झाली आहेत. ज्या कार्यालयात शक्य आहे तिथे डबेवाले सायकलवर जेवणाचे डबे पोहचवत आहेत. परंतु जोपर्यंत लोकल सेवा बहाल होत नाही तोपर्यंत डबेवाला आपली सेवा पुर्ण क्षमतेने देऊ शकत नाही.
महत्वाच्या बातम्या :-
मनसैनिकांचा गनिमी कावा ; लोकलने प्रवास करून आंदोलन केले यशस्वी !
मराठा आरक्षणाच्या १३% जागा रिक्त ठेवून पोलीस भरती करावी ; विनायक मेटेंची मागणी
पोलीस आयुक्तपद सोडताना विश्वास नांगरे पाटील झाले भावूक , म्हणाले….
“तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, राज्यातील पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत ! “
बाप रे ! गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९६,४२४ रुग्ण वाढले !!
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. रेल्वे सुरू करा अन्यथा….. ; मनसेच्या आंदोलनाला मुंबईच्या डबेवाल्यांचा बिनशर्त पाठिंबा ! InShorts Marathi.

मनसैनिकांचा गनिमी कावा ; लोकलने प्रवास करून आंदोलन केले यशस्वी !

Previous article

‘त्या’ अभिनेत्रीचं नाव घ्यायची तिची लायकी नाही ; कंगनावरून गृहमंत्री संतापले

Next article

You may also like

Comments

Comments are closed.