मुख्य बातम्या

काश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा ; शिवसेनेची भाजपवर टीका

0

नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी तयार करण्याचे म्हटले. योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यानंतर आज सामना अग्रलेखातून त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. तसेच कश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, असा खोचक सल्लाही भाजपला दिला आहे .
“लॉकडाऊनमुळे चित्रीकरण आणि चित्रपटांचे प्रदर्शन बंद असताना योगीजींनी नव्या फिल्मसिटीची संकल्पना मांडली आहे. अर्थात मुंबईच्या चित्रनगरीचे महत्त्व हे कायमच राहील. खरं तर 370 कलम हटवल्यानंतर केंद्राने कश्मिरात अशा एखाद्या फिल्मसिटीची योजना राबवायला हवी. एकेकाळी आमच्या सिनेजगतास चित्रीकरणासाठी कश्मीर, सिमला, मनाली, शिलाँग अशा भागांची भुरळ पडली होती. रोमॅण्टिक गाण्यांसाठी कश्मीर हे आवडते ठिकाण होते. तेथेही भव्य फिल्मसिटी उभारता येईलच.
शेवटी प्रत्येकाने भारतीय सिनेसृष्टीत आपले योगदान दिलेच आहे. दादासाहेब फाळके व महाराष्ट्राने सिनेसृष्टीत सगळ्यांना समावून घेतले. हा उद्योग मोठा केला. त्यावर आता चिखलफेक सुरु आहे. पण इतर राज्येही मुंबईप्रमाणे सिनेउद्योगास चालना देणार असतील तर त्यांना शुभेच्छा”, असं सामना अग्रलेखात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

अहमदनगरमध्ये राजकीय खळबळ ; सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश
पाच वर्षे सुडाचे बळी ठरलो पण आता सुडाचे राजकारण करणार नाही : धनंजय मुंडे
OBC आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास… ; OBC समाजाचा राज्य सरकारला इशारा
मुंबईची तुंबई झाल्यावर बोंबा मारणारे नागपूर,अहमदाबाद जलमय झाल्यावर गप्प का? सेनेचा खोचक सवाल
जंबो कोविंडसेंटरमधून बेपत्ता झालेल्या लेकीसाठी माऊलीचे आमरण उपोषण

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. काश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा ; शिवसेनेची भाजपवर टीका InShorts Marathi.

पुण्यात रात्री 7 नंतरही मिळणार हॉटेलमधले जेवण ; आला ‘हा’ नवीन नियम

Previous article

अजितदादांच्या कामाचा पुन्हा भल्या पहाटे दणका ; मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ

Next article

You may also like

Comments

Comments are closed.