खेळटॉप पोस्ट

हा भारतीय खेळाडू करणार तब्बल 8 वर्षानंतर टेस्ट क्रिकेट मध्ये पुनरागमन

0

अफगानिस्तान विरुध्द होणाऱ्या एकमेव टेस्ट मॅचमध्ये विकेट किपर वृध्दीमान सहाच्या जागी आता दिनेश कार्तिकची वर्णी लागली आहे. आयपीलच्या  दुसऱ्या क्वाॅलिफायर सामन्यात केकेआर विरुध्द खेळताना वृध्दीमान सहाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.

2004 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दिनेश कार्तिकने 2010 नंतर एकही टेस्ट मॅच खेळली नाही. त्यामुळे अफगानिस्तान विरुध्द होणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये दिनेश कार्तिक तब्बल 8 वर्षानंतर टेस्ट क्रिकेट मध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने भारताकडून आजपर्यंत 23 टेस्ट मॅच खेळल्या आहेत.

Loading...

2018 च्या आयपीलमध्ये दिनेश कार्तिकने संघाचे प्रतिनिधित्व करताना संघाला क्वाॅलिफायर पर्यंत पोहचवले होते. तसेच त्याने 49.80 च्या सरासरीने 498 धावा केल्या होत्या  व त्याचाच  फायदा त्याला झाला असल्याचे बाेलले जात आहे.

तसेच अफगानिस्तान संघाची ही पहिलीच टेस्ट मॅच असल्याने त्यांचासाठी हा सामना एेतिहासिक असणार आहे. तसेच या सामन्यात भारताच्या संघाचे नेतृत्व अजिंक्य राहणे करणार आहे.

READ THIS NEWS IN ENGLISH HERE

Loading...

तेलंगणा दिवसानिम्मित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या शुभेच्छा

Previous article

भारतीय फुटबाॅल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने केले चाहत्यांना भावनिक आवाहन

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ