टॉप पोस्टराजकारण

राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त भय्युजी महाराज यांची आत्महत्या

0

इंदूर:-

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सतत वावर असलेले आध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांनी स्वतावर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या नंतर त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतू तेथे त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले.

Loading...

काही दिवसा पूर्वी मध्यप्रदेश सरकार ने त्यांना मंत्री पदाचा दर्जा दिला होता. भय्युजी महाराज (उदयसिंह देशमुख ) यांनी कौटुंबिक कालाहातून स्वतहला राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. यावरून की ते काही कारणाने खूप उदास असल्याचे कळते आहे.

भय्युजी महाराज यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक महत्वाच्या जबाबदर्‍या पार पडल्या आहेत. अनेक राजकीय नेत्यांशी, उद्योजकांशी त्यांचे चांगले संबंध होते.  आंदोलन, उपोषण या सारख्या घटनांमध्ये त्यांनी अनेकदा मध्यस्थाची भूमिका निभावली होती. 2011 सालच्या आण्णा हजारे यांच्या उपोषणात मध्यस्थाची भूमिका निभावणार्‍यांमधले ते एक होते. त्यांची राजकीय नेत्यांमध्ये नेहमी उठ बस असायची, अनेकदा राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, त्यांना एकत्र आणणे यामुळे ते अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसत असत.  महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या राजकरणात भय्युजी महाराजयांची यांची वेगळी ओळख होती. सिनेसृष्टीतील अनेकांबरोबर त्यांचे चांगले संबंध होते.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ते राष्ट्रसंत म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या प्रकृती पाहण्यासाठी त्यांचे समर्थक हॉस्पिटलच्या बाहेर जमले होते.

 आत्महत्याच्या काही वेळ आधी भय्युजी महाराज यांनी केले होते  हे ट्विट- 

भय्युजी महाराज यांनी फेसबूक पेज वर आत्महतेच्या 9 तास आधी टाकलेली पोस्ट –
Image may contain: 1 person, text
(PHOTO INPUT:- FACEBOOK/BHAYUJIMAHARAJ)
Loading...

ट्रंप-किम एेतिहासिक भेटीत घडल्या अनेक महत्वाच्या घटना 

Previous article

आरएसएसच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांच्यावरील आरोप निश्चित

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *