मुख्य बातम्या

माफ कर मित्रा, आम्ही तुला वाचवू शकलो नाही ; पांडुरंगच्या जाण्याने सत्यजीत तांबे झाले भावुक

0

‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहिनीचे पुण्यातील रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचं बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झालं. ते 42 वर्षांचे होते.
पांडुरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

पांडुरंग रायकर यांच्या निधनावर युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी शोक व्यक्त केला आहे. नगर जिल्ह्याचे सुपुत्र, पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन झाल्याच्या बातमीने सुन्न झालोय, असं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय.
सर्व मित्र त्याच्यासाठी झटत होते. पुण्यात करोनाचं संकट वाढत असताना हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध नाहीत, खूप प्रयत्न केल्यानंतर जागा मिळाली खरी पण… माफ कर मित्रा, आम्ही तुला वाचवू शकलो नाही, असं ट्विट सत्यजित तांबे यांनी केलं आहे.

नगर जिल्ह्याचे सुपुत्र, पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाल्याच्या बातमीने सुन्न झालोय.त्याच्यासाठी सर्व मित्र झटत होते, पुण्यात कोरोनाचे संकट वाढत असतांना हाॅस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध नाहीत, खूप प्रयत्न केल्यानंतर जागा मिळाली खरी पण…माफ कर मित्रा,आम्ही तुला वाचवू शकलो नाही. pic.twitter.com/7qoYYP6uia
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) September 2, 2020

महत्वाच्या बातम्या :-
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
राज्यात तब्बल १४,८८८ रुग्णांची वाढ , एकूण बाधितांचा आकडा ७,१८,७११वर
अनलॉक-4मध्ये राज्यात ‘हे’ सुरू आणि ‘हे’ बंद राहणार , वाचा सविस्तर
कोरोनाचा कहर सुरूच ! पुणे, मुंबई, ठाण्यात पुन्हा वाढू लागले रुग्ण !!
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. माफ कर मित्रा, आम्ही तुला वाचवू शकलो नाही ; पांडुरंगच्या जाण्याने सत्यजीत तांबे झाले भावुक InShorts Marathi.

गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी शुभ मुहूर्त, विसर्जनाचे महत्त्व आणि पूजा विधी जाणून घ्या !

Previous article

गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीसांनी मानले पुणेकरांचे आभार

Next article

You may also like

Comments

Comments are closed.