मुख्य बातम्या

पहाटे सरकार स्थापनेच्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असणार ; शिवसेनेचा धक्कादायक गौप्यस्फोट

0

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही आयपीएस अधिकारी हे ठाकरे सरकार पाडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतु, आज शिवसेनेनं आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
‘फडणवीस यांनी पहाटे शपथविधी पार पाडला. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाट्य वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले’ असा दावा सेनेनं केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत सडकून टीकास्त्र सोडले आहे.
‘काही अधिकारी आजही उच्चपदी विराजमान आहेत. ठाकरे सरकार येऊ नये म्हणून उघड प्रयत्न करूनही आपले कोणी काय वाकडे केले या थाटात ते वावरत असतात. सरकारला धोका असतो तो याच प्रवृत्तीपासून. सरकार पाडणे म्हणजे काय असते? सरकारसंदर्भातले काही विषय गुप्तपणे विरोधकांकडे पोहोचवणे व सरकारच्या विरोधात प्रशासकीय यंत्रणेत अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे. अशा प्रवृत्तींवर निगराणी ठेवणे हे गृहखात्याचे काम आहे. ते त्यांनी चोख पार पाडले तर सरकारचे भवितव्य उत्तम आहे. सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न कोणताही अधिकारी करीत नाही. ते फक्त मनसुबेच ठरतात, पण अस्तनीत निखारे हे असतातच’ असा सणसणीत टोला सेनेनं लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
इंदू मिलच्या पायाभरणीवरून मानापमान नाट्य सुरु ; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
दिशा सालीयानच्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते ; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची हजेरी
कांदा उत्पादकांसाठी शरद पवार मैदानात ; मोदी सरकारला चांगलेच खडसावले !
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पहाटे सरकार स्थापनेच्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असणार ; शिवसेनेचा धक्कादायक गौप्यस्फोट InShorts Marathi.

करून दाखवलंच ! आंदोलन यशस्वी केल्यानंतर संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया !!

Previous article

मोठी बातमी – मुंबईत भाजपला उच्च न्यायालयाचा दणका , दिले ‘हे’ आदेश !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.