मुख्य बातम्या

मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जातोय – शिवसेना

0

सोशल मीडियाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र सध्या त्यावर सुरू असणाऱ्या धुमाकुळावर कोणतेही निर्बंध अथवा मर्यादा नाहीत. याच मुद्द्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून निशाणा साधण्यात आला आहे. “मुंबई आणि महाराष्ट्राची सुनियोजित पद्धतीने बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जात आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि मराठी माणूस त्याचा अनुभव घेतच आहे” असं म्हटलं आहे.
तसेच पुन्हा या गॉसिपिंगचा कोणी त्यांच्या पद्धतीने समाचार घेतलाच तर तुमची ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळी मांजरे लगेच आडवी जातात. तथाकथित मुस्कटदाबीच्या बोंबा मारल्या जातात असं देखील म्हटलं आहे.”सरकारी बंधनाचा भाग म्हणून खोटीनाटी टीका सहन करणे काही यंत्रणांना अपरिहार्य असले तरी सोशल मीडियावर चौखूर उधळणाऱ्यांनी या निर्बंधांचा गैरफायदा घ्यावा असे नाही.
सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती रामण्णा यांना हेच सुचवायचे असावे. अर्थात रामण्णा यांनी जी खंत व्यक्त केली आहे ती न्यायाधीशांपुरती मर्यादित असली तरी आजकाल गॉसिपिंगला कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. ना क्षेत्राचे बंधन, ना टीकेची मर्यादा. सोशल मीडियावर सक्रिय असणारे सगळेच बेभान आहेत असे नाही, पण बहुतांश मंडळींना कसलेच भान राहत नाही. न्या. रामण्णा यांनी व्यक्त केलेली खंत म्हणूनच महत्त्वाची ठरते. ती समजून घेण्याचा समंजसपणा सोशल मीडियावरील बेलगाम मंडळी दाखवतील का, हाच खरा प्रश्न आहे” असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

Loading...

बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करत कंगनाचा पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला
उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख पडला महागात ; अब्रूनुकसानीचा कंगनाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
कंगना सोडून आता कोरोनाकडे लक्ष द्या ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
फडणवीस मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला नसता : जयंत पाटील
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जातोय – शिवसेना InShorts Marathi.

Loading...

आदित्यसोबत असलेली मंडळी उघडी पडल्याने मुख्यमंत्री माझ्याविरोधात गेलेत ; कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

Previous article

फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर…. ; कंगनाने शिवसेनेला पुन्हा डिवचले

Next article

You may also like

Comments

Comments are closed.