मुख्य बातम्या

…तर मी ट्विटर कायमचं सोडेन ; कंगनाचं विरोधकांना नवं आव्हान

0

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना तर तिने सॉफ्ट पॉर्नस्टार असं म्हटलं होतं. मात्र या संपूर्ण वादावर आता कंगना रणौत पडदा टाकण्यासाठी तयार आहे. ही लढाई कंगनाने सुरु केली, असं कोणी सिद्ध करुन दाखवलं तर ती ट्विटर कायमचं सोडून देईल, असं आव्हान तिने आपल्या विरोधकांना दिलं आहे.

I may come across as a very ladaku person but it’s not true, I have a record of never starting a fight, I will quit twitter if anyone can prove otherwise, I never start a fight but I finish every fight. Lord Krishna said when someone aks you to fight you mustn’t deny them
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 17, 2020

“लोक मला भांडखोर प्रवृत्तीची व्यक्ती समजतात, परंतु हे असत्य आहे. आजवर कधीही मी स्वत:हून लढाई सुरु केलेली नाही. समोरुन आरोप झाल्यानंतरच मी प्रत्युत्तर दिलं आहे. या लढाईची सुरुवात माझ्यामुळे झाली हे जर कोणी सिद्ध करुन दाखवलं तर मी ट्विटर कायमचं सोडून देईन. ही लढाई कायमची संपवेन.
भगवान श्री कृष्ण यांनी सांगितलय जर कोणी लढाईसाठी आव्हान देत असेल तर त्या आव्हानाला नकार देऊ नका.” अशा आशयाचं ट्विट कंगना रणौतने केलं आहे. कंगनाने घेतलेली ही नवी भूमिका सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :-

कंगना द्रौपदी तर उद्धव ठाकरे दुःशासन ; शहरात लागलेल्या पोस्टरवरून राजकीय महाभारत पेटले !
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी होणार ; गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना कडक आदेश
पुण्यात मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल 25 लाख रुपयांचा दंड
मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !
दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर मंदिरं उघडली असती ; भाजपचा आरोप

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. …तर मी ट्विटर कायमचं सोडेन ; कंगनाचं विरोधकांना नवं आव्हान InShorts Marathi.

कोरोनाच्या महासंकटाबद्दल बोलताना मुख्यमंत्री सहाय्यता निधी अधिकाऱ्यांना कोसळले रडू !

Previous article

“बाप मुख्यमंत्री आणि स्वतः कॅबिनेट मंत्री असूनसुद्धा कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात चालले आहेत”

Next article

You may also like

Comments

Comments are closed.