Royal Entertainmentमुख्य बातम्या

दुसरे लग्न करून अशाप्रकारे बदलले या ६ टीव्ही अभिनेत्रींचे आयुष्य, आज बनवली आहे आपली एक विशेष ओळख

0

टीव्ही जगतातील प्रसिद्ध शो क्योंकि सास भी कभी बहू थी मधील सुहासीची भूमिका साकारलेली अभिनेत्री पूजा घईने दुसरे लग्न करून आपला संसार पुन्हा थाटला होता. आपल्या लग्नाची बातमी तिने इंस्टाग्रामवर फोटो शेयर करून दिली होती. पूजा सहित अनेक टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्रींनी दुसरे लग्न केले आहे आणि आज त्या आनंदाने आपल्या कुटुंबासोबत लाईफ एन्जॉय करत आहेत.
गौतमी कपूरटीव्ही जगतातील फेमस जोडी गौतमी कपूर आणि राम कपूर टीव्ही जगतातील परफेक्ट कपल म्हणून फेमस आहे. गौतमीचे राम कपूर सोबत पहिले लग्न नाही आहे. याआधी गौतमीने फोटोग्राफर मधुर श्रॉफसोबत लग्न केले होते. हे लग्न फार काळ टिकले नाही. आता गौतमी राम कपूरसोबत खूपच खुश आहे आणि आपली लाईफ एन्जॉय करत आहे.
दीपिका कक्कड़टीव्ही जगतातील विवादित शो बिग बॉस १२ ची विनर टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कडने आपला को-स्टार रौनक सॅमसनशी २००९ मध्ये पहिले लग्न केले होते. लग्नाच्या तीन वर्षांपर्यंत त्यांनी हि गोष्ट लपवून ठेवली. हे नाते जास्त दिवसांपर्यंत टिकू शकले नाही आणि २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. ससुराल सिमर का च्या सेट वर दीपिकाची दोस्ती शोएब इब्राहिमसोबत झाली २०१३ मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. शोएबने कुटुंबाच्या उपस्थितीमध्ये २०१७ मध्ये नच बलियेच्या सेटवर दीपिकाला प्रपोज केले होते. दोघांनी २२ फेब्रुवारी २०१८ मध्ये लग्न केले. दीपिकाने लग्नाच्यावेळी धर्मपरिवर्तन केले होते.
रूचा गुजरातीटीव्ही जगतातील प्रसिध्द शो कुसुम, कुमकुम और गंगा सारख्या सिरीयलमध्ये काम केलेली रूचा गुजरातीने पहिल्या लग्नामध्ये खूप त्रास सहन केला. रुचाने बिजनेसमन मितुल सांघवीसोबत ऑक्टोबर २०१२ मध्ये लग्न केले होते आणि एप्रिल २०१३ मध्ये दोघे वेगळे झाले. रुचाचे वेगळे होण्याचे कारण मानसिक आणि शारीरिक त्रास होता. यानंतर रुचाने २०१६ मध्ये आपला जवळचा मित्र विशालसोबत लग्न केले.
अश्विनी कळसेकरबॉलीवूड आणि टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी कळसेकरने अभिनेता नितेश पांडेसोबत लग्न केले होते. त्यांचे हे लग्न फक्त ४ वर्षेच टिकले. यानंतर अश्विनीने मुरली शर्मासोबत लग्न केले. मुरली शर्माने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यामध्ये गोलमाल सीरीज, ब्लॅक फ्राइडे सहित मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. तर अश्विनीने अनेक सिरीयलमध्ये काम केले आहे. या सिरियल्समध्ये शांति, शक्तिमान, कसम से, जीते हैं जिसके लिए आणि कवच काली शक्तियों से सामील आहेत. त्याचबरोबर अनेक मोठे चित्रपट देखील सामील आहेत.
श्वेता तिवारीटीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लोकप्रियता एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. एकता कपूरच्या सिरीयल कसौटी जिंदगी मधून देशभरामध्ये फेमस झालेली अभिनेत्री श्वेता तिवारीने पहिल्या लग्नामध्ये खूप त्रास सहन केला. श्वेताने राजा चौधरीसोबत लग्न केले होते ज्यानंतर मारहाणीची बातमी आली. नंतर श्वेताने राजा चौधरीला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर श्वेताने अभिनव कोहलीसोबत लग्न केले. श्वेता आणि अभिनवला एक मुलगा आहे. तर राजा चौधरीपासून एक मुलगी पलक आहे.
तनाज ईरानीबॉलीवूड आणि टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री तनाज ईरानी सध्या दीपिका कक्कडच्या कहां तुम कहां हम मध्ये पाहायला मिळत आहे. तनाजने बख्तियार ईरानीसोबत दुसरे लग्न केले आहे. बख्तियार तनाजपेक्षा ८ वर्षाने लहान आहे. बख्तियारच्या अगोदर तनाजने प्रसिद्ध थिएटर आर्टिस्ट फरीद कुरीमसोबत लग्न केले होते तथापि त्यांचे हे लग्न टिकले नाही.
The post दुसरे लग्न करून अशाप्रकारे बदलले या ६ टीव्ही अभिनेत्रींचे आयुष्य, आज बनवली आहे आपली एक विशेष ओळख appeared first on Yesमराठी.

अनुष्का शर्मा पासून सलमान खानच्या गर्लफ्रेंड पर्यंत, या अभिनेत्रींनी केले क्रिकेटर्ससोबत लग्न, आता अशी आहे लाईफ

Previous article

अक्षय कुमारचा मुलगा ह्या हॉ ट अभिनेत्रीवर झाला आहे फिदा ,सर्वांसमोर आरवने सांगितली मनातली ती गोष्ट …

Next article

You may also like

Comments

Comments are closed.