खेळमुख्य बातम्या

सिंधूची सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

0

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्य सामन्यात ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने चीनच्या शेन युफेईला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. आज झालेल्या सामन्यात सिंधूनं चीनच्या चेन यू फेई हिचा २१-७, २१-१४ अशी मात करीत सहज विजय मिळवला.

सलग तिसऱ्यांदा ती या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. मागील दोन वेळा तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. यंदाच्या स्पर्धेत ती सोनेरी कामगिरीसह पराभवाची हॅटट्रिक टाळण्याच्या इराद्यानेच कोर्टवर उतरेल.

Loading...

पहिल्या सेटमध्ये सिंधूनं सुरुवातीला आक्रमक खेळ करीत आघाडी घेतली. सिंधूच्या आक्रमक खेळापुढे चीनच्या चेन यू फेईवर दबाव आला. त्यामुळे चेनने बऱ्याच चुका केल्या. तिच्या या चुकाचा अचूक फायदा सिंधूनं उचलला. मध्यान्ह होईपर्यंत सिंधूनं ११-३ अशी आघाडी घेतली.

Loading...

राहुल गांधींसह इतर नेत्यांना श्रीनगर विमानतळावर रोखलं

Previous article

कर्जमाफीची फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात गुन्हा दाखल करणार

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in खेळ