Royal Entertainmentमुख्य बातम्या

सिद्धार्थ जाधव यांची बायको कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, त्यांच्या लग्नाची एक छान प्रेम कहाणी आहे

0

मराठी चित्रपटात अनेक अभिनेते अभिनेत्री होऊन गेल्या. आपल्या अभिनयातून त्यांनी अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच चित्रपट सृष्टीत त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. बरेच अभिनेते असे आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आणि दाखवून दिले कि सुंदरतेपेक्षा उत्कृष्ट अभिनय हा यशाची गुरुकिल्ली आहे. आज आपण अश्याच एका अभिनेत्या बद्दल बोलणार आहोत ज्यांनी खूप मेहनत घेऊन चित्रपट विश्वास आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. “सिद्धार्थ जाधव” नाव सर्वांना ओळखीचे असेलच. सिद्धार्त ह्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप कमीत कमी कालावधीत भरपूर प्रसिद्धी प्राप्त केली आहे. मग ती प्रसिद्धी चित्रपटात असो किंवा नाटकामध्ये असो त्या काही विषमता नाही. सिद्धार्थ जाधव ह्यांचे पूर्ण नाव सिद्धार्थ रामचंद्र जाधव आहे. त्यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९८१ मध्ये झाला. मराठी चित्रपटांतील कॉमेडी किंग म्हणून त्याची ओळख आहे.

सिद्धार्थ जाधव ह्यांनी अनेक दूरदर्शन मालिकेत हि काम केले आहे. तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटा हि सिद्धार्थ ह्यांनी आपली भूमिका उत्कृष्टपणे पार पडली आहे. तसेच सिद्धार्थ ह्यांनी बरेच नाटकही केले आहे. त्यामुळे ह्या सर्व क्षेत्रातून त्याला प्रेक्षकांनी खूप पसंत केले आहे आणि तो सर्वांचा आवडीचा बनला आहे. सिद्धार्थ ग्रॅज्युएशन शिक्षण रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. जेव्हा तो रुपारेल महाविद्यालयात होता तेव्हा त्याने अनेक एकांकिकांमध्ये आपली भूमिका केली आहे. खरं बघायला गेले तर देवेंद्र पेम यांच्या ‘तुमचा मुलगा करतो काय’ या नाटकापासून सिद्धार्थ प्रकाशझोतात आला. सिद्धार्थ ने जागो मोहन प्यारे, लोच्या झाला रे हि प्रसिद्ध नाटकात हि अभिनय केला आहे. त्यांचे प्रमुख चित्रपट बघतील तर ते हे आहे जत्रा, दे धक्का, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय.

सिद्धार्थ आणि तृप्तीची प्रेम कहाणी:
सिद्धार्थ जाधव ह्यांनी तृप्ती जाधव यांच्या बरोबर विवाह केला आहे. त्यांच्या लग्नाची एक छान प्रेम कहाणी आहे. तुम्ही वाचाल तर तुम्हाला खूप विशेष वाटेल. चला तर मग वाचूया- प्रेम करायला दिसणे लागत नाही तर प्रेम करायला लागते ते म्हणजे चांगला स्वभाव आणि अश्या चांगल्या स्वभावामुळे एका व्यक्तीच प्रेम जुळले आणि तो म्हणजे आपला सिद्धार्थ जाधव. बघायला गेले तर सिद्धार्थ दिसायला एकदम सुमार आणि घरची परिस्थिती हि खूप गरिबीची होती. पहिल्या पासून अभिनयाची आवड असल्यामुळे त्याने नाटकात काम करायला सुरुवात केली. आणि नाटकात काम करत असताना त्याच्या आयुष्यात एक स्वप्नातील परी आली. आणि एका क्षणात ती त्याची होऊन गेली. सिद्धार्थ जाधव “राम भरोसे” हे नाटक असिस्ट करत होता आणि त्या नाटकासाठी ऑडिशन चालत होत्या. ऑडिशन चालू असताना सिद्धार्थ समोर एक मुलगी आली, तिने न घाबरता, कोणाची न पर्वा करता, तिने अभिनय करून दाखवला. त्या मुलीचा स्वभाव आणि तिचा अभिनय सिद्धार्थ ला बघत्याच क्षणी आवडून गेला. त्या मूळचे नाव होते तृप्ती अकलवार. दिसायला एकदम साधी, सुंदर आणि सोज्वळ. सिद्धार्तच्या मनात ती बघत्याच क्षणी भरली आणि सिद्धार्थ ने त्यांच्या सरांना सांगितले सुद्धा कि ह्या मुली मध्ये काहीतरी विशेष आहे हि आपल्या नाटकाला नक्कीच वर घेऊन जाईल. परंतु तृप्ती ने ह्या नाटकाला नकार दिला.पण सिद्धार्थ ची इच्छा होती तिने नाटकात काम करावे. त्यानंतर सिद्धार्थ तिच्या प्रेमात खूप वेडा झाला.

सिद्धार्थ ने ठरवले होते कि आता तृप्ती ला प्रपोस करायचं म्हणजे करायचं. तो खूप वेळेस तिला भेटला पण त्याची हिम्मत नाही होत होती. परंतु शेवट तो क्षण आलाच सिद्धार्त ने तृप्ती ला प्रपोस केले ते कुठे तुम्हाला माहित आहे का? त्याने चक्क एलफिस्टन च्या रेल्वेस्टेशन तिला प्रपोस केले. ती तारीख होती १० जुलै २००२. रेल्वेस्टेशन वर तो तृप्ती सोबत गेला आणि त्याने तिला विचारले कि “माझ्याशी लग्न करशील का?” पण तृप्ती ने घाई केली नाही तिने शांतपणे सिद्धार्थ ला सांगतिले कि लग्न मध्ये खाऊ आहे का… सर्व विचार करून निर्णय घ्यावा लागतो… मला वेळ हवा आहे. मग सिद्धार्थ ने तृप्ती ला सांगितले चालेल पण मित्र म्हणून तर आपण राहू शकतो ना?? मग तृप्ती आणि सिद्धार्त मित्र म्हणून राहू लागले. पण काही दिवसांनी तृप्तीला जाणवले कि सिद्धार्थ आपल्या बाबतीत खूप पजेसिव्ह आहे, त्याला आपण कोणाशी बोललेले आवडत नाही, मला कोणाचा फोन आला तर त्याला आवडत नव्हते म्हणून तिने सिद्धार्थ ला सांगितले कि आपण मैत्री इथेच थांबवू, तू तुझ्या कामावर वर लक्ष्य दे मी माझ्या कामावर लक्ष्य देते. आणि बघता बघता काही वर्ष गेली तृप्ती ला जाणवू लागले कि कि आपण एक चांगला मित्र गमावला आहे. म्हणून इन सिद्धार्थ सोबत परत मैत्री केली आणि बघता बघता ह्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले व जास्त विचार न करता त्यांनी पुढे जाऊन लग्न केले.

The post सिद्धार्थ जाधव यांची बायको कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, त्यांच्या लग्नाची एक छान प्रेम कहाणी आहे appeared first on Live Marathi Batamya.

‘कूच कूच होता है’ मधली छोटी अंजली झाली मोठी

Previous article

मराठी अभिनेत्रींनी केली शक्‍तीस्वरूप दुर्गेची उपासना

Next article

You may also like

Comments

Comments are closed.