Royal politicsभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

नाशिकच्या इतिहासामुळे शिवसेनेला बदलावा लागणार लोकसभेचा उमेदवार ? का ते वाचा

0

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांसह 2019 च्या लोकसभा निवडणुकीच वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केलीय. महाराष्ट्रात असणाऱ्या लोकसभेच्या 48 जागांवर लढतीसाठी पक्षांकडून रणनीती आखण्यात येत आहे. दरम्यान, नाशिक लोकसभेचा विचार केल्यास सध्या शिवसेनेचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. पण इतिहासाची उजळणी केल्यास पक्षाला पुन्हा विजय हवा असल्यास आपला उमेदवार बदलावा लागणार आहे, अन्यथा विजयापेक्षा पराभवाची शक्यता जास्त असल्याचं दिसत आहे.

नाशिक जिल्ह्याचे राजकारण

Loading...

उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असणाऱ्या नाशिक जिल्ह्यावर सुरुवातीपासूनच काँग्रेसचा पगडा राहिलेला आहे. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर नाशिकने शरद पवार यांना साथ दिली. आदिवासी बहुल असणाऱ्या सुरगाणापासून ते नांदगाव आणि सिन्नर पासून मालेगावपर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे. मात्र पुढे शिवसेनेन जिल्ह्यात आपली ताकद निर्माण केली. मालेगावतील हिंदू- मुस्लिम दंगल, तसेच देवळालीमध्ये झालेल्या जातीय तणावाने शिवसेनेला ताकद दिली. त्यामुळे आज जिल्ह्यात संमिश्र वातावरण पहायला मिळते.

जिल्ह्यात असणाऱ्या एकूण 15 विधानसभा मतदारसंघांपैकी मोदी लाटेत भाजपचा 4 जागांवर विजय झाला, तर शिवसेनेला 4 राष्ट्रवादी काँग्रेसला 4, काँग्रेस 2 आणि माकपला 1 जागेवर विजय मिळाला. म्हणजेच जिल्ह्याने सर्वच पक्षांना कमी अधिक प्रमाणात संधी दिली आहे.

लोकसभेचा विचार केल्यास जिल्ह्यात असणाऱ्या दोन मतदारसंघात अनुक्रमे 1 जागा शिवसेनेकडे तर 1 जागा भाजपकडे आहे. तर मालेगाव बाह्य, मध्य आणि बागलाण विधानसभा या धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेल्या आहेत, येथे भाजपचे केंद्रीय मंत्री सुभाष भामरे हे निवडून आलेले आहेत.

काय आहे नाशिक लोकसभेचा इतिहास ?

1991 पासूनचा इतिहास पाहिल्यास त्यावेळी काँग्रेसचे डॉ वसंत पवार हे विजयी झाले, 96 मध्ये शिवसेनेचे राजाराम गोडसे यांना जनतेने साथ दिली, तर 98 ला पुन्हा काँग्रेस पक्षाच्या बाजूने नाशिककरांनी कौल देत माधवराव पाटील यांना विजयी केले. 1999 ते 2004 ला शिवसेनेचे उत्तमराव ढिकले यांना संधी मिळाली. पुढे 2004 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे देविदास पिंगळे हे विजयी झाले. तर 2009 ला राष्ट्रवादीचेच समीर भुजबळ विजयी झाले आणि आता 2014 मध्ये हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आला.

2004 आणि 2009 चा अपवाद वगळता कोणत्याही पक्षाला तसेच उमेदवाराला दोनवेळा संधी मिळाली नाही. त्यामुळे 2019 च्या निवडणुकांत शिवसेनेला पुन्हा नव्याने नाशिक लोकसभेवर सत्ता हस्तगत करायची असल्यास उमेदवार बदलावा लागणार हे निश्चित आहे. अन्यथा इतिहासाने पुनरावृत्ती केल्यास पराभव होऊ शकतो.

दिवंगत खा. वनगा यांच्या निधनानंतर भाजपने आम्हाला वाऱ्यावर सोडलं, वणगा कुटुंबियांची व्यथा

नाशिकमध्ये सेनेला लॉटरी : भाजप,राष्ट्रवादी,काँग्रेस,मनसे,जनता दलाला धक्का, नरेंद्र दराडे विजयी

Loading...

MDH मसालेचे संस्थापक महाशय धर्मपाल निधनाची बातमी केवळ अफवा

Previous article

पवारांचे जसे सर्वपक्षीय मित्र आहेत तसे आपलेही सर्व पक्षात मित्र आहेत,उदयनराजेंचा सूचक इशारा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.