Royal politicsमुख्य बातम्या

शिवसेनेचा दसरा मेळावा, काल-आज आणि उद्या…

0
दरवर्षी मुंबईत शिवतीर्थावर दसऱ्याला शिवसेनेचा मेळावा होत असतो, या ही वेळेला लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी जमा होणार आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दसरामेळाव्यात पक्षाकडून काय घोषणा केली जाते याची सगळ्यांना उत्सुकता असेल. महाराष्ट्राच्या राजकरणाला हा मेळावा नक्की काय वळण देतो हे सुद्धा पाहण्यासारखे ठरेल.

कसा सुरू झाला दसरा मेळावा ?

19 जून 1966 ला बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली, त्यानंतर विचारांचे सीमोल्लंघन करण्यासाठी एक मेळावा घेण्याचे ठरले, विरोधकांनी त्या वेळेला मेळाव्यासाठी मैदान कशाला हवे एखादा हॉल घ्या,निदान भरून तरी जाईल अशी चेष्टा केली होती, मात्र, मुंबईमधल्या शिवाजी पार्क या ठिकाणी मेळावा घेण्याचं निश्चित करण्यात आला.

30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेचा दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिला मेळावा झाला आणि मुंबईनेच नाही तर सगळ्या देशाने त्या मेळाव्याचे विराट स्वरूप पाहिले. शिवाजी पार्कचे मैदान गर्दीने तुडुंब भरले होते, बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी मराठी माणूस एकत्र आला होता. हाच मराठी माणूस पुढे शिवसेनेची ताकद बनला.

Loading...

त्यांनतर शिवसेना, दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क अस जणू एक समीकरणच तयार झालं. याच मेळाव्यात बाळासाहेबांना शिवसैनिकांनी ‘शिवसेनाप्रमुख’ हे बिरुद बहाल केले.

बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवतीर्थावर येत असे. बाळासाहेब सुद्धा आपल्या खास ठाकरी शैलीतून सगळ्या विरोधकांचा समाचार घेत असत.

दसरा मेळावा हे शिवसेनेचे जणू शक्तिप्रदर्शन करण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ बनले त्यामुळेच दसऱ्याला शिवसैनिक लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर जमतात.बाळासाहेबांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा वारसा सुरूच ठेवला आहे.

बाळासाहेबांनंतरचे दसरा मेळावे – 

बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची धुरा आली. उद्धव ठाकरे यांच्या वक्तृत्वाची धार बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकी नसल्यामुळे शिवसेनेच्या मेळाव्यांना पहिल्यासारखी गर्दी होणार नाही असे अनेक विरोधकांचे म्हणणे होते. मात्र शिवसैनिक आणि शिवाजी पार्क यांचे नाते अजूनही अतूट असल्याचे समजते.

बाळासाहेबांच्या जाण्यानंतरही शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची अभूतपूर्व गर्दी या आधीच्या सेना मेळाव्याला पाहायला मिळाली आहे.

येत्या 18 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याची तयारी शिवसेनेने खूप आधी सुरू केल्याचं समजतंय. वाजत गाजत, गुलाल उधळत, शिस्तीत या! असे आवाहन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून करण्यात आले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे.

शिवसेना पक्षप्रमुख या मुद्द्यांवर काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष – 

  • भाजपचा राज्यकारभार,राफेल करार
  • पेट्रोलचे वाढते दर
  • राम मंदिर आणि हिंदुत्व
  • येणाऱ्या निवडणुका

अशा असंख्य मुद्यांवर शिवसेनेची भूमिका काय असणार या बद्दलचे मत उद्धव ठाकरे व्यक्त करतील अशी आशा शिवसैनिकांना आहे.


हे ही वाचा – 

‘कोहिनूर’ हिरा कसा लागला इंग्रजांच्या हाती, उलगडले गूढ

या कारणामुळे कन्हैया कुमारला होऊ शकते अटक

मध्यप्रदेशात शिवसेना विधानसभेच्या रिंगणात; जाहीर केली उमेद्वारांची यादी


 

Loading...

‘प्रधानमंत्री पदासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती योग्य’

Previous article

MeToo :- कोण आहेत एम जे अकबर; ज्यांना लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर द्यावा लागला राजीनामा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *