Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

अखेर भाजप शिवसेनेचं जमलं; आजपासून ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

0

स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही शिवसेनेने कायम विरोधी पक्षाची भूमिका निभावली. सामनातून शिवसेनेने जोरदार प्रहार केलेत. तर भाजपनेही शिवसेनेकडे अखेर दुर्लक्ष केलं. अशा वातावरणात महाराष्ट्रात चौरंगी लढत होणार अशी शक्यता असताना अखेर भाजप आणि शिवसेनेचं जमलं आहे. 2019 ची लोकसभा आणि त्यानंतरची विधानसभा निवडणूक दोनही पक्ष एकत्र लढणार आहेत.

शिवसेनेने स्वबळाची आणि भाजपने मोदींच्या करिष्म्यावर निवडणूक जिंकण्याच्या घोषणा केल्या तरीही दोघांनाही वस्तुस्थितीची जाणीव होती. परिस्थिती ओळखून भाजपने शिवसेनेला युतीची टाळी फार पूर्वीच दिली होती. तर शिवसेनेने भाजपला ताटकळत ठेवलं होतं. शिवसेनेची ही रणणीती जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्यासाठीच होती हे आता स्पष्ट झालंय.

Loading...

कृषी विषयक बातम्या वाचण्यासाठी कृषीनामा या वेबसाईटला भेट द्या

2014 च्या निवडणूकीत भाजपने 26 तर शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. लढवलेल्या 26 पैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 22 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्रातल्या एकूण 48 जागांपैकी भाजप आणि शिवसेनेने तब्बल 41 जागा जिंकल्या होत्या. विरोधकांच्या वाट्याला फक्त 7 जागा आल्या होत्या.

भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले असते तर दोनही पक्षांना त्याचा फटका बसला असता. याची जाणीव दोनही पक्षांना होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्यावेळी कटुता निर्माण झाल्याने शिवसेना दुखावली होती. 25 वर्ष मोठा भाऊ म्हणून भूमिका घेतल्यानंतर नमतं घेणं शिवसेनेला कठीण गेलं.

शिवसेना बदललेली परिस्थिती स्वीकारण्यास तयार नव्हती. तर लोकसभेतल्या मोदी लाटेत ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर भाजपच्या डोक्यात हवा गेली होती. मात्र बदलती परिस्थिती लक्षात घेऊन युतीचा निर्णय झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसणार आहे.

Loading...

‘प्रेरणा प्रकल्पा’तून आतापर्यंत सुमारे ९० हजार शेतकऱ्यांचे समुपदेशन

Previous article

शिवजयंतीच्या मुद्द्यावरून मोदी शाह यांच्यावर राष्ट्रवादीचा निशाणा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.