मुख्य बातम्या

कोरोनामुळे शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा यंदाच्या वर्षी रद्द होणार ?

0

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्यावर यंदा कोरोनाचं संकट आहे. शिवाजी पार्क येथे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा मेळावा होतो. मात्र मुंबईत वाढत चाललेली कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता यंदाचा दसरा मेळावा रद्द होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास सरकारकडून बंदी आहे.
या वर्षी गुढीपाढवा, गणेशोत्सव, रमजानसारख्या सणावर कोरोनाचं सावट असल्याने अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. गुढीपाढव्याला निघणारी शोभायात्राही रद्द झाली. येत्या २५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. यावर्षीचा दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी विशेष असणार आहे. शिवसेनेची सत्ता, त्यात ठाकरे कुटुंबातील व्यक्ती – तीही खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला वेगळंच महत्त्व आहे.
पण अद्याप पक्षामध्ये दसरा मेळाव्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, कोरोनाची परिस्थिती पाहता दसरा मेळावा होण्याची शक्यता कमी आहे. परंतु त्याबाबत कालांतराने निर्णय होईल. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करु शकतात असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-

आता मूक मोर्चे नाही संघर्ष अटळच ; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला कडक इशारा
आनंदाची बातमी : कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मुंबईत विशेष एसटी बस सेवा सुरु !
भाजपच्या पोटात आहे तेच कंगनाच्या मुखात,छत्रपतींची जनता यांना माफ करणार नाही – बाळासाहेब थोरात
माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी ; शरद पवारांनी कंगनाची उडवली खिल्ली
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढला तर आंदोलन होणार नाही – शरद पवार

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कोरोनामुळे शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा यंदाच्या वर्षी रद्द होणार ? InShorts Marathi.

शेतक-यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव : बाळासाहेब थोरात

Previous article

महत्वाची बातमी : रिया चक्रवर्तीच्या न्यायलयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.