मुख्य बातम्या

शिवसेना,राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणा पलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध करावा – बाळासाहेब थोरात

0

कृषी विधेयकांसंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सध्या स्वतंत्र भूमिका घेण्यात आली आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध केला पाहिजे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ते मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणू पाहत असलेल्या कृषी कायद्यांसंदर्भात सविस्तरपणे भाष्य केले.
त्यांनी म्हटले की, शेतीची अर्थव्यवस्था माहिती असलेले लोक कृषी विधेयके चुकीचीच आहेत, असे सांगतील. केंद्र सरकारच्या जाहिराती बारकाईने पाहिल्यास सरकारचा फसवेपणा लक्षात येईल. बाजार समिती हे आधारभूत किंमत देण्याचे महत्त्वाचे स्थान आहे. त्या मोडीत काढून शेतमालाची विक्री बाजार समितीच्या बाहेर होणार आहे. मग तिकडे आधारभूत किंमत कशी मिळू शकते, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. तसेच राज्यसभेत या विधेयकांवर चर्चा न होताच कृषी विधेयके आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. ही दडपशाही आहे. सरकार सक्तीने काही कायदे करू पाहत आहे. या कायद्यांमुळे देशात पुन्हा कंपनी राज येईल.
कृषी क्षेत्रात बाजार समित्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. या शेतकरी संस्था मोडल्या की शेतकऱ्यांची मुंडी शहरातील व्यापाऱ्याच्या हातात जाईल. व्यापारी शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे देईल की नाही, याची शाश्वती नाही, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या :-

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अशा होणार परीक्षा ; परीक्षेसाठीचा पॅटर्न जाहीर
आम्ही उगाचच 30 वर्ष शिवसेनेच्या प्रेमात पडलो ; शहराच्या नामांतरावरुन औरंगाबादकरांच्या प्रतिक्रिया
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
छत्रपतींच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकार ‘एवढं’ करू शकत नाही ; भाजपकडून राज्यसरकारचा तिव्र निषेध

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शिवसेना,राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणा पलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध करावा – बाळासाहेब थोरात InShorts Marathi.

शेतकऱ्यांसाठी शरद पवारांचा आज अन्नत्याग ; कृषी विधेयकावरून शरद पवार मोदी सरकार आमनेसामने

Previous article

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी क्वीन चित्रपट निर्माता मधु मांटेनाला NCBचा समन्स !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.