मुख्य बातम्या

तुम्हा सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेली ,आता मारा बोंबा ; कंगनावरून शिवसेनेची टोलेबाजी

0

राज्यातील महाविकास आघाडी सरकारसह मुंबई व मुंबई पोलिसांवर टीका करणारी अभिनेत्री कंगना राणावत ही आज मुंबईहून पुन्हा हिमाचल प्रदेशातील आपल्या गावी रवाना झाली. ही संधी साधून शिवसेनेने आता टोलेबाजी केली आहे.
 

‘कुत्रीचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच’ या म्हणीचा अर्थ मला आज तंतोतंत कळला आहे. ज्या लोकांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी गेले आठवडाभर कंगनाची बाजू घेतली, त्या सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेलीआता मारा बोंबा…जय महाराष्ट्र !
— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) September 14, 2020

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही कंगनाच्या बाजूने बोलणाऱ्यांना टोला हाणला आहे. ‘कुत्रीचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच’ या म्हणीचा अर्थ मला आज तंतोतंत कळला आहे. ज्या लोकांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी गेले आठवडाभर कंगनाची बाजू घेतली, त्या सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेली आता मारा बोंबा… जय महाराष्ट्र ! असं त्यांनी म्हटलं आहे.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानं कंगना राणावत वादात सापडली होती. शिवसेनेसह राज्यातील सत्ताधारी पक्षांनी तिच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. कंगनानंही शिवसेनेला आव्हान दिल्यानं हा वाद चिघळला होता. त्यात भाजप उघडपणे कंगनाच्या बाजूनं उतरल्यानं या साऱ्याला पूर्णपणे राजकीय स्वरूप आलं होतं. आता कंगना पुन्हा हिमाचलला परतल्यानं सत्ताधारी पक्षांनी तिच्यासह तिच्या समर्थकांवरही टीकेची झोड उठवली आहे.
महत्वाच्या बातम्या :-

मी राष्ट्रवादीचा आमदार आहे म्हणत रोहित पवारांचा ‘या’ संघटनेला विरोध
बबड्याची सीरिअल पाहण्याऐवजी…’ ; रोहित पवारांनी शेलारांना सुनावले खडे बोल
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
लॉकडाऊन हा विषय आता संपला ; राजेश टोपे यांचा मोठा खुलासा
महाविकास आघाडीने लोकशाहीचा गळा घोटला ; भाजपचा गंभीर आरोप

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. तुम्हा सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेली ,आता मारा बोंबा ; कंगनावरून शिवसेनेची टोलेबाजी InShorts Marathi.

कंगना हिमाचलला परत गेली? ; काँग्रेसने कंगनाला पुन्हा डिवचले

Previous article

कंगना प्रकरण संपलं आता तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या ; मिटकरींची प्रसारमध्यमांना विनंती

Next article

You may also like

Comments

Comments are closed.