Royal politicsटॉप पोस्ट

Sunanda Pushkar Case:- पत्नीच्या मृत्यू प्रकरणात शशी थरूर यांना जामीन

0

दिल्ली उच्च न्यायालयाने सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणात आरोपी ठरवलेल्या कॉंग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांना जामीन मंजूर केला आहे. सुनंदा पुष्कर या शशी थरूर यांच्या पत्नी असून त्यांच्या संशयास्पद झालेल्या मृत्यू प्रकरणी थरूर यांना आरोपी ठरवण्यात आले होते.

पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी शशी थरूर आरोपी-

Loading...

2014 साली जानेवारी महिन्यात दिल्ली मधील एका आलिशान हॉटेल मध्ये सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. थरूर आपल्या बंगल्याचे काम सुरू असल्याने पत्नी सोबत हॉटेल मध्ये राहत होते. परंतू त्यानंतर अचानक या हॉटेल माध्ये त्यांच्या पत्नीचा मृतदेह आढळल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते.

यात शशी थरूर यांनी त्यांच्या पत्नीला छळल्या प्रकरणी आणि आत्महत्येला प्रवृत केला अशा आरोपाखाली अटक करण्यात आली होती. कलम 306 (आत्महत्येला प्रवृत करणे) आणि कलम 498 ए (महिलेचा छळ) या कलामंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाने मंजूर केला जामीन- 

आज शनिवारी होणार्‍या सुनावणीसाठी शशी थरूर सकाळी दिल्लीतील पटियाला न्यायालयात हजर झाले होते. त्यांच्या कडून नियमित जामिनासाठी अर्ज केला. सेशन्स कोर्ट ने अटक पूर्व जमीन मंजूर केल्याने आता नियमित अर्जाचा गरज नाही असे सांगत उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. कारण 2 दिवस आधी म्हणजे 5 जुलै ला शशी थरूर यांना दिल्लीतील सत्र न्यायलयाने अटकपूर्व जमीन मंजूर केला होता.

अटक होईल या भीतीने थरूर यांनी आधीच दिल्लीतील सत्र न्यायलयात अटक पूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला होता.

पण जामीन मंजूर केला असला तरी, पुराव्यांबरोबर कोणतीही छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये, आणि न्यायालयाच्या परवानगी शिवाय देशाच्या बाहेर जाऊ नये असा निर्देश न्यायालयाने थरूर यांना दिला आहे.

या मृत्यू प्रकरणासंबंधित सुब्रमण्यम स्वामी यांनी अर्ज दाखल केला होता. की या प्रकरणाबाबत पोलिसांनी गोपनीय अहवाल सादर करावा, यावर थरूर यांच्या वकिलाने प्रश्न उपस्थित केला आहे. आणि सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात बाजू मांडण्यास वेळ आणि संधी द्यावी असे संगितले.

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाची पुढील सुनावणी आता 26 जुलै ला होणार आहे.

Loading...

पाकिस्तानमध्ये हिंदू महिला पहिल्यांदाच लढणार निवडणुका, या महिलेने प्रचारला केली सुरुवात

Previous article

Fake News Alert : पोलिस तुमचे मेसेज पाहणार ? जाणून घ्या व्हाॅट्सअॅपवर फिरणाऱ्या या मेसेजची सत्यता

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *