मुख्य बातम्या

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावरून शरद पवार म्हणतात…

0

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी अद्यापही तपास सीबीआय कडून सुरु असून ड्रग्ज प्रकरणात रोज नव्या सेलिब्रेटींची नावं समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत असताना गेल्या तीन महिन्यांपासून एका आत्महत्येवर इतकी गंभीर चर्चा सुरु आहे अशी विचारणा करत नाराजी व्यक्त केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शरद पवारांना सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सुरु असलेल्या तपासात आता ड्रग्ज प्रकरणी अनेक सेलिब्रेटींची नावं समोर येत असल्यासंबंधी विचारलं असता त्यांनी म्हटलं की, “मला माहिती नाही, मी याकडे लक्ष देत नाही.आत्महत्या कोणाचीही असो दुख होतं यात काही वाद नाही. पण एका आत्महत्येवरुन गेले तीन महिने देशात इतकी गंभीर चर्चा सुरु आहे. पण मला भीती आहे ती म्हणजे दिवसाला १० ते १५ तर महिन्याला ५० ते ६० शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करणं मला योग्य वाटत नाही”.
महत्वाच्या बातम्या :-

आनंदाची बातमी : कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मुंबईत विशेष एसटी बस सेवा सुरु !
शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात मग मराठा आरक्षणावर अजून गप्प का? नीलेश राणेंचा थेट सवाल
माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी ; शरद पवारांनी कंगनाची उडवली खिल्ली
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढला तर आंदोलन होणार नाही – शरद पवार
कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवारांनी केंद्राला खडसावले, म्हणाले ….

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावरून शरद पवार म्हणतात… InShorts Marathi.

तुम्ही आम्हाला पोरकं करून गेलात ; आशाताईंच्या जाण्याने सुबोध भावे झाले भावुक

Previous article

शेतक-यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव : बाळासाहेब थोरात

Next article

You may also like

Comments

Comments are closed.