मुख्य बातम्या

कंगना प्रकरणावरून शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले? राऊतही नरमले

0

कंगना शिवसेनेचा वाद सध्या चांगलाच चिघळला आहे. कंगना ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. दरम्यान BMCने कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर केलेली कारवाई सुडबुद्धीतून केल्याचा आरोप देखील शिवसेनेवर करण्यात आला. बीएमसीने बुधवारी केलेल्या कारवाईनंतर देखील काही संतप्त ट्वीट कंगनाने केले होते.
मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या विधानामुळे संजय राऊत यांनीही कंगनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. इतकचं नाही तर हरामखोर हा शब्दप्रयोग केल्यामुळे संजय राऊत यांच्यावरही टीका झाली.मात्र काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. यानंतर शिवसेना,संजय राऊत यांनी कंगनाबद्दल थोड दमानेच घेतलेलं दिसतंय.अभिनेत्री कंगना रणौत हिच्या कार्यालयावर महापालिकेने कारवाई करण्याची वेळ चुकीची आहे. मुंबईत अनेक अवैध बांधकामे आहेत. अशा कारवाईमुळे निष्कारण शंकेची पाल चुकचुकते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत बॉलीवूड माफियांशी संबंध असल्याचे वक्तव्य करून बदनामी केल्याप्रकरणी कंगना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कंगनाच्या बेकायदा बांधकामावर केलेल्या कारवाई प्रकरणी कोणत्याही प्रकारे थेट संबंध नसतानाही उद्धव ठाकरेंवर आरोप करत बदनामी केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. मात्र याबद्दल आता उघडपणे बोलण्यास समोर आलं नाहीये.
कंगनाच्या या वादावरून नारायण राणे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या पोलिसांवरील त्या वादग्रस्त वक्तव्याची आठवण करून दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी एका भाषणामध्ये “मुंबई पोलिसांना मी सांगतो की भाजपची धुनी भांडी करू नका ,कपडे धुवायचेच असतील तर खाकी उतरवा आणि त्यांच्याच घरी कामाला जा ” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार नारायण राणे यांच्याकडून घेण्यात आला. ‘ज्या पोलिसांसाठी तुम्ही कंगनाच्या कार्यालयावर हल्ला केलात त्यांच्याबद्दल तुम्ही बोललात ते कितीपत योग्य आहे? पोलिसांना तुम्ही कपडे भांडी धुण्याबद्दल तुम्ही बोलता मग त्याच पोलिसांचा गराडा दाऊद येणार म्हणून तुमच्या मातोश्रीला का? असा सवाल राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. ठाकरे सरकार म्हणजे दुतोंडी माणस आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
सुशांतसिंह राजपूतची मँनेजर दिशा सालीयनने आयोजित केलेल्या एका पार्टीत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री नुपूर मेहता यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे.त्यामुळे आता आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. यावर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे बघणं महत्त्वाचं आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी देखील आरोप केला होता. एक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, “सरकारला माहिती आहे की यात आदित्य ठाकरे फसलेले आहेत आणि त्यांना सरकारमधील काही मंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.मी माझ्या मुलाखतीत पन्नास वेळा सांगितले आहे की आदित्य ठाकरे यांचा सुशांतसिंह प्रकरणात हात आहे. ते स्वतः यात अडकले असून त्यांच्या जवळच्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. दिशा सालियान आणि सुशांतसिंह या दोघांच्या घटनेबद्दल आदित्य ठाकरे यांना शंभर टक्के पुर्ण माहिती आहे. पण हे सामूहिक पद्धतीने लपवलं जात आहे, दररोज शिवाजी पार्कमध्ये या लोकांच्या बैठका व चर्चा होतात, काय करायचं, कसं आदित्य ठाकरेंना वाचवायचं याबाबत तेथे चर्चा केली जाते.” असाही आरोप राणे यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
फडणवीस मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला नसता : जयंत पाटील
दहा-पंधरा वर्षांपूर्वी वर आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत ; खडसेंचा फडणविसांवर हल्ला

मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला खडा सवाल

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात…
पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तातडीने मदत द्या ; फडणवीसांची सरकारकडे मागणी
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कंगना प्रकरणावरून शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले? राऊतही नरमले InShorts Marathi.

चिंताजनक : महाराष्ट्रात दर तासाला होतेय 1000 नव्या कोरोनाच्या रुग्णांची भर !

Previous article

दिशा सालीयानच्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते ; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.