मुख्य बातम्या

कांदा उत्पादकांसाठी शरद पवार मैदानात ; मोदी सरकारला चांगलेच खडसावले !

0

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा तडकाफडकी निर्णय घेतल्याने देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला असून केंद्राने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. तर शेतकऱ्यांचं मरण हेच मोदी सरकारच धोरण आहे का असा सवाल देखील आता उपस्थित होत आहे.केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. हे भाजप सरकार शेतकर्‍यांना परावलंबी ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सध्या शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, कांदाना निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही मैदानात उतरले असून, त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. कांद्याच्या प्रश्नावरून शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून, केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नाबाबत सक्रिय झालेल्या शरद पवार यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्याबाबत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी काल रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली होती. वरील विनंतीला अनुसरून मी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली.

To address this issue, I met Union Minister of Commerce and Industry Shri. Piyush Goyal (@PiyushGoyal) today and apprised him of the plight of onion growers. I pointed out to him that these onion growers are mainly small land holders and Jirait [email protected] #onionexportban
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 15, 2020

Loading...

महत्वाच्या बातम्या :-

‘दिल्लीत पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत’- भाजप आमदार
कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवारांनी केंद्राला खडसावले, म्हणाले ….
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
दोषी प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड, न भरल्यास ३ महिने तुरुंगवास
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कांदा उत्पादकांसाठी शरद पवार मैदानात ; मोदी सरकारला चांगलेच खडसावले ! InShorts Marathi.

Loading...

राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरू होण्याची शक्यता कमी ; शिक्षणमंत्र्यांचा मोठा खुलासा

Previous article

महाराष्ट्र राजभवनाचं RSS शाखा किंवा BJP कार्यालय म्हणून नामकरण करायचं का?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.