मुख्य बातम्या

‘या’ कामासाठी खुद्द शरद पवारांनीच थोपटली धनंजय मुंडेंची पाठ !

0

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कार्यअहवाल सादर करण्याची परंपरा अखंडपणे सुरूच ठेवली आहे. कोरोनावर मात केल्यानंतर जून ते ऑगस्ट या दरम्यानच्या कामकाजाचा लेखाजोखा धनंजय मुंडे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार व राज्यातील जनतेसमोर मांडला आहे.
सामाजिक न्याय विभाग, पालकमंत्री म्हणून बीड जिल्हा स्तरावर व परळी या त्यांच्या मतदारसंघात केलेले महत्वपूर्ण कामकाज, घेतलेले निर्णय व कोरोनाविषयक उपाययोजना आदींचा लेखाजोखा अहवाल स्वरूपात मांडण्याची सुरू केलेली परंपरा अखंडित ठेवली आहे.
परळी, बीड व मुंबई असा सातत्याने प्रवास, अनेक लोकांशी थेट संपर्क यादरम्यान जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंडेना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामकाजाचा त्यांनी रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डातून अहवाल सादर केला होता. कोरोनावर मात करून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे परत कामाला लागले.
मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यापासून अविरतपणे कार्यअहवाल सादर करून त्याद्वारे पक्षाला, राज्य सरकारला तसेच राज्यातील तमाम जनतेला जाहीरपणे आपली कामे अहवाल स्वरूपात सादर करण्याची अभिनव परंपरा जपल्याबद्दल ना. मुंडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विशेष कौतुक केले आहे; तसेच पुढेही ही परंपरा अबाधित ठेवावी असेही पवार यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी : शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून सडेतोड उत्तर देणाऱ्या संजय राऊतांची नियुक्ती !
लवकरच शालेय शिक्षणात शेती विषयाचा समावेश करणार ; मोदीसरकारचा विचार सुरू
पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तातडीने मदत द्या ; फडणवीसांची सरकारकडे मागणी
शिरुरमधील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘या’ कामासाठी खुद्द शरद पवारांनीच थोपटली धनंजय मुंडेंची पाठ ! InShorts Marathi.

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अशा होणार परीक्षा ; परीक्षेसाठीचा पॅटर्न जाहीर

Previous article

विद्यार्थ्यांनो अभ्यास सुरू करा ; अंतिम वर्षांच्या परीक्षेचे वेळापत्रक झाले जाहीर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.