Royal politicsटॉप पोस्टभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

पवार फॅक्टर ; सर्व नेत्यांना मागे टाकत पवार एक नंबरवर !

0

शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्ता संघर्षावरुन सुरु असलेला तिढा अद्यापही कायम आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ‘गुगल सर्च’मध्ये देशभर ट्रेंडिग आहेत. २४ ऑक्टोबरला शरद पवार यांच्याबद्दल ‘गुगल’वर सर्वाधिक सर्च करण्यात आले. पवार यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस, तसेच उद्धव ठाकरे हे आहेत.

आतापर्यंत सातत्याने गुगल सर्चमध्ये शरद पवार ट्रेंडिंगमध्ये असल्याचे ‘गुगल ट्रेंड’च्या माहितीवरून दिसते. ‘गुगल सर्च’, ‘गुगल न्यूज’ आणि ‘यूट्यूब’ यांच्या एकत्रित सर्चवरून ‘गुगल ट्रेंड’ची आकडेवारी उपलब्ध होत असते.

निवडणुकीच्या काळात शरद पवार यांनी झंजावाती प्रचार केला.  सातारा येथे त्यांनी पावसात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पवार यांच्या सभांना तरुण वर्गाने मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या

१ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबरमध्ये संजय राऊत ट्रेंडिंग

१ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर या काळात संजय राऊत यांच्याबद्दल गुगलवर सर्वाधिक सर्च झाले आहे. ‘संजय राऊत न्यूज’, ‘संजय राऊत ट्विटर’ यासारखे सर्च कीवर्ड नेटकऱ्यांनी केले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडली. वृत्तवाहिन्यांवर त्यांच्या प्रतिक्रिया चर्चात राहिल्या.

दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्ता संघर्षावरुन सुरु असलेला तिढा अद्यापही कायम आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२ नोव्हेंबर रोजी एक महत्वाची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक बोलवल्याच्या वृत्तावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.

सत्ता संघर्षच्या या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बोलावलेल्या या बैठकीच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात चर्चाना उधान आले आहे. बोलावलेल्या बैठकीत शरद पवार नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर पवार शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचं मन वळवतात का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

मोठी बातमी- शरद पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Previous article

फडणवीसांनी देखील टाळली भिडेंची भेट, भिडे म्हणाले “मी पुन्हा येईल” !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.