खेळटॉप पोस्ट

‘बाॅल आॅफ द सेंच्यूरी’ शेन वाॅर्नच्या त्या एेतिहासिक बाॅलला झाली आज 25 वर्ष

0

3 ते 7 जुन 1993 रोजी खेळल्या गेलेल्या इंग्लंड विरुध्दच्या सामन्यात आॅस्ट्रोलियाच्या शेन वाॅर्नने आपल्या पहिल्याच अॅशेस सीरीजमधील पहिल्याच ‘मिस्ट्रियस’ बाॅलवर विकेट घेतली होती. हा बाॅल ‘बाॅल आॅफ द सेंच्यूरी’ म्हणून देखील ओळखला जातो.

शेन वाॅर्नने आपल्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडच्या माइक गॅटिंगची विकेट घेतली होती. लेग ब्रेक टाकलेला हा बाॅल शार्प टर्न घेत गॅटिंगच्या आॅफ स्टंपवर लागला होता. हा विलक्षण बाॅल बघून माइक गटिंग व अंपायर देखील आश्चर्यचकित झाले होते.

Loading...

या सामन्यात शेन वाॅर्नने 8 विकेट घेत आॅस्ट्रोलियाच्या विजयात  महत्वाची भूमिका बजावली होती.

या सामन्यात प्रथम बॅंटिग करताना आॅस्ट्रोलियाने पहिल्या डावात 289 धावा केल्या होत्या तर धांवाचा पाठलाग करताना इंग्लंडचा पहिला डाव 210 धावांवर आटोपला होता. दुसऱ्या डावात आॅस्ट्रोलियाने 5 विकेट गमावत 435 धावांवर घोषित केला होता. सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरेला इंग्लंड संघ शेन वाॅर्नच्या बाॅलिगसमोर 332 धावांपर्यंतच मजल मारू शकला व त्यांना 179 धांवाने पराभव स्विकारावा लागला होता.

या संपुर्ण सीरीज मध्ये शेन वाॅर्नने 34 विकेट घेत मॅन आॅफ द सीरीजचा पुरस्कार देखील पटकवला होता. तसेच आॅस्ट्रोलियाने या सिरीजमध्ये 4-1 ने विजय मिळवला होता.

(PHOTO INPUT :- FACEBOOK/ICC)

Loading...

शेतकर्‍यांच्या संतापाचा पुन्हा उद्रेक, होईल का मागण्याची पूर्तता पूर्ण?

Previous article

नितीश कुमार करणार बिहारमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचे नेतृत्व

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ