Royal politicsटॉप पोस्ट

देशद्रोहाचा आरोप – जेएनयू पॅनेलने कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांची शिक्षा ठेवली कायम

0

जेएनयूच्या उच्चस्तरीय तपास समितीने उमर खालिदला काॅलेजमधून काढण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्याच बरोबर कन्हैया कुमारवर 10 हजार रुपयांचा दंड लावला आहे.

2016 फेब्रुवारीमध्ये या विद्यार्थ्यांनी अफजल गुरूच्या फाशीच्या विरोधात प्रदर्शन केले होते. तसेच तथाकथित देशविरोधी घोषणा केल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. या आरोपांबाबतीत तपास समितीने हा निर्णय दिला आहे.

Loading...

या तपास समितीमध्ये 5 व्यक्ती आहेत. त्यांनी हा निर्णय दिला.

या निर्णया विरोधात जेएनयूचे विद्यार्थी हे उच्च न्यायालयात देखील गेले होते.

काय आहे पुर्ण प्रकरण?

कन्हैया कुमार, खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांना फेब्रुवारी 2016 मध्ये या अफजला गुरूच्या फाशीच्या विरोधात केले गेलेल्या कार्यक्रमात भाग घेतल्याने जेल झाली होते. नंतर त्यांना बेल देखील मिळाली होती.

2016 मध्ये जेएनयू तपास समितीने या बाबतीत खालिद आणि अन्य दोन विद्यार्थ्यांना काढण्याचा निर्णय घेतला होता, तर त्यावेळेसचा जेएनयूचा प्रेसिडेंट कन्हैया कुमारवर दंड लावला होता. आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केलेले नाही.

Loading...

कर्नाटक सरकारने केली शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत मोठी घोषणा, शेतकर्‍यांना दिला मोठा दिलासा

Previous article

निकाल दिल्ली सरकारच्या बाजूने लागला असे म्हणणे चुकीचे ठरेल- अरुण जेटली

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *