Royal politicsटॉप पोस्ट

भारत बनलाय या आंतरराष्ट्रीय संघटनेचा संपूर्ण सदस्य; पहिल्यांदाच सहभागी होणार या संघटनेच्या परिषदेत

0

भारत पहिल्यांदाच शांघाय सहकार संघटनेमध्ये पूर्ण सदस्य म्हणून सहभागी होणार आहे. अस्ताना येथे झालेल्या शांघाय सहकार संघटनेच्या राज्यपरिषद प्रमुखांच्या बैठकीत  भारताला संघटनेचे संपूर्ण सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली होती.

2017 साली मिळालेल्या संपूर्ण सद्स्यतेनंतर ह्या परिषदेत सहभागी होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान असतील.

Loading...

काय आहे शांघाय सहकार संघटना ?

शांघाय सहकार संघटना (एससीओ) ही एक कायमस्वरूपी आंतर्राष्ट्रीयस्तरीय संघटना आहे,  15 जून 2001 रोजी शांघाय (चीन) मध्ये कझाकस्तान प्रजासत्ताक, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, रशियन फेडरेशन, किर्गिझ रिपब्लिक  ताजिकिस्तान गणराज्य आणि उझबेकिस्तान गणराज्य यांचायाद्वारे या संघटनेची निर्मिती केली गेली.

2002 साली सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या संघटनेच्या अध्यक्षांच्या बैठकीत शांघाय सहकार संघटनेच्या सनद वर स्वाक्षरी करण्यात आली व सप्टेंबर 2003 ला ती लागू करण्यात आली.

शांघाय सहकार संघटना प्रमुख ध्येय-

सदस्य राज्यांमध्ये परस्पर विश्वास मजबूत करणे; राजकारण, व्यापार, अर्थव्यवस्था, संशोधन, तंत्रज्ञान आणि संस्कृती, याबरोबरच शिक्षण, ऊर्जा, वाहतूक, पर्यटन, पर्यावरण संरक्षण आणि अन्य क्षेत्र एकमेकांना सहकार्य करणे;  या प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य राखण्यासाठी आणि ते सुनिश्चित करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणे.

शांघाय संघटना ही परस्पर विश्वास, परस्पर लाभ, समानता, परस्पर विचारविनिमय, सांस्कृतिक विविधतेबद्दल आदर आणि सर्वसाधारण विकासाच्या तत्त्वावर आधारित अंतर्गत धोरणाचा पाठपुरावा करतो.

शांघाय संघटनेमध्ये स्टेट कौन्सिल (एचएससी) ही निर्णय घेणारी प्रमुख संस्था आहेत. ते वर्षातून एकदा भेटते आणि संघटनेच्या सर्व महत्त्वपूर्ण बाबींवर निर्णय आणि मार्गदर्शक तत्वे अवलंबन करतात. सध्याच्या महत्वाच्या आर्थिक आणि अन्य सहकार्याच्या मुद्यांचे निवारण करण्यासाठी आणि संघटनेच्या वार्षिक अर्थसंकल्पांना मंजुरी देण्यासाठी, संस्थेच्या बहुपक्षीय सहकार्याचे धोरण आणि प्राधान्य क्षेत्रावर चर्चा करण्यासाठी वर्षातून एकदा शासकीय परिषदचे अध्यक्ष (हेड ऑफ कौन्सिल) एकत्र येतात.

संघटनेचे दोन कायमस्वरुपी संस्था-

शांघाय सहकार संघटना सचिवालय (बीजिंग) आणि प्रादेशिक दहशतवाद विरोधी संघटनेच्या कार्यकारिणी समिती (आरएटीएस) (ताश्कंद). एससीओ सचिव-जनरल आणि एससीओ आरएटीएसच्या कार्यकारी समितीचे संचालक यांची नेमणूक तीन वर्षाच्या मुदतीसाठी कौन्सिल ऑफ हेड ऑफ स्टेट कडून केली जाते. 1 जानेवारी 2016 पासून रशीद अलिमॉव (ताजिकिस्तान) आणि येवगेनी सायसोयव्ह (रशिया) यांनी अनुक्रमे या पदांवर कार्यरत आहेत.

रशियन आणि चिनी  या शांघाय संघटनाच्या अधिकृत भाषा आहेत.

शांघाय सहकार संघटनामध्ये  यावेळी आठ सदस्यीय देश सहभागी होणार आहेत, ज्यात भारत गणराज्य, कझाकस्तान गणतंत्र, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, किर्गिझ रिपब्लिक, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, रशियन फेडरेशन, ताजिकिस्तान गणराज्य आणि उजबेकिस्तान गणराज्य यांचा समावेश असणार आहे.

2017 साली झालेल्या या राज्य परिषदेच्या प्रमुखांच्या बैठकीत शांघाय सहकार संघटनेने  भारताबरोबरच पाकिस्तानला सुद्धा संपूर्ण सदस्याची   मान्यता दिली.

Loading...

2019 च्या लोकसभा निवडणुकीत हा पक्ष उभे करणार 543 महिला उमेदवार

Previous article

TRAILER :- सैराटचा रिमेक असलेल्या ‘धडक’चा ट्रेलर रिलीज

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *