Royal politicsटॉप पोस्ट

या देशाने दिले महिलांना पहिल्यांदाच ड्रायव्हिंग लायसन्स

0

सौदी अरबमध्ये १० महिलांना पहिल्यांदाच ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले आहे. सौदी अरब च्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे.

सौदी अरब चे राजे मोहम्मद बिन सलमान यांनी महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या अंतर्गत सौदी अरबमधील महिलांवरील ड्रायव्हिंगचा प्रतिबंध हटवण्यात आला आहे.

Loading...

सौदी अरबची राजधानी रियाद आणि अन्य शहरांमधून १० महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात  आले आहे, या नंतर पुढील आठवड्याभरात २ हजार    महिलांना लायसन्स देण्यात येईल असे सेंटर फॉर इंटरनॅशनल कम्युनिकेशन या सौदी अरब च्या सूचना मंत्रालयाच्या विभागकडून सांगण्यात आले आहे. जून महिन्याच्या शेवट च्या आठवड्यापर्यंत सौदी अरबमधील महिला रस्त्यावर गाडी चालवताना दिसतील.

सौदी अरबमध्ये महिलांच्या ड्रायव्हिंग वरील प्रतिबंध हटवण्यासाठी तेथील महिला अधिकार कार्यकर्त्यांकडून ड्रायव्हिंग हक्क मिळवून देण्यासाठी अभियान राबवले जात होते. या कारणाने सौदी अरब सरकारकडून त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती.

महिलांना ड्रायव्हिंग चा अधिकार देण्यात येण्याचा निर्णय सौदी अरब चे राजे मोहम्मद बिन सलमान यांच्या उदरीकरणाच्या धोरणा अंतर्गत घेण्यात आला आहे. या २०१५ आधी साली सौदी अरबमधील महिलांना पहिल्यांदाच निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा हक्क देण्यात आला होता.

(PHOTO INPUT : FACEBOOK)

 

Loading...

‘धोनी सारखे आमच्याकडे 11 खेळाडू, प्रत्येकाच्या आयुष्यावर एक चित्रपट निघू शकतो’

Previous article

भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी ५ जणांना अटक

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *