मुख्य बातम्या

‘संभाजी महाराज दारूच्या कैफेत’ राज्यसरकारच्या पुस्तकात वादग्रस्त मजकूर

0

सध्या शिक्षण मंत्रालय सतत वादाच्या भावर्‍यात सापडत आहे. आता आणखी एक वादग्रस्त प्रकार सर्व शिक्षा अभियानाच्या राज्यसरकारच्या ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर जबर आक्षेप घेतला आहे.

‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’. असा वादग्रस्त उल्लेख या पुस्तकात असल्याचे समोर आले आहे. ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकातील पान 18 वर संभाजी महाराजांविषयी असा उल्लेख करण्यात आला आहे.

(sarva shiksha abhiyan samarth shree ramdas swami)
Loading...

(sarva shiksha abhiyan samarth shree ramdas swami)

नक्की प्रकरण आहे तरी काय –

  • ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा मजकूर या पुस्तकात आहे.
  • हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले असून सर्व शिक्षा अभियानात ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा समावेश देखील आहे. नागपूरमधील लाखे प्रकाशनाने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
  • 2017- 2018 असे पुस्तक प्रकाशनचे वर्ष आहे.

हा प्रकार दुर्दैवी असून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.  सर्व शिक्षा अभियानाच्या या पुस्तकातून कोणतेही सबल पुरावे असताना संभाजी महाराज्यांची बदनामी करण्यात आली आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आहे.

संभाजी महाराज दारुच्या कैफात होते, या उल्लेख करण्यात आलेल्या वाक्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.

यावरून आता विरोधकांनी राज्यसरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. सुप्रिया सुळे यांनी राज्यसरकारचा निषेध केला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी राज्यसरकारने हे पुस्तक सर्व शिक्षा अभियानातून मागे घ्यावे अशी मागणी केली आहे.


हे ही वाचा-  

‘तितली’चा धोका; ओडिशा आणि आंध्रप्रदेशातील 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

#Metoo नाना पाटेकरसह तीन जणांवर गुन्हा दाखल, होणार का अटक?


 

Loading...

आत्महत्या रोखण्यासाठी या देशाने केली मंत्र्याची नेमणूक

Previous article

लक्ष्य २०१९ : कल्याणमध्ये फिर एक बार – नरेंद्र पवार ?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *