Royal Entertainmentमुख्य बातम्या

‘माझ्यासमोर घेतले होते सुशांतने ड्रग्ज’, या अभिनेत्रीने केला खुलासा

0

मुंबई- केदारनाथ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आणि त्यानंतर सुशांतने तिच्यासमोर ड्रग्स घेतले होते, असा दावा अभिनेत्री सारा अली खानने केला आहे. दीपिका, सारा आणि श्रद्धा कपूरची चौकशी एनसीबीने केली आहे.
या तिनही अभिनेत्रींचे फोन एनसीबीने जप्त केले आहेत. चौकशी दरम्यान सारा अली खान म्हणाली तिने कधीच ड्रग्स घेतले नाहीत. अभिनेत्री श्रद्धा कपूरने देखील ड्रग्स न घेतल्याचे सांगितले आहे. श्रद्धाने ही स्वत: कधीच ड्रग्सचे सेवन केले नसल्याचे सांगितले पण सुशांत ड्रग्स घ्यायचा असे तेही म्हणाली.
रिया चक्रवर्तीच्या जबाबानुसार एनसीबीने सारा आणि श्रद्धाची चौकशी केली. मात्र या दोघींचे ड्रग्सबाबत कोणतचे चॅट नाही आहेत. ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्रींच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. अभिनेत्री दीपिका पादुकोण असो किंवा सारा अली खान सगळ्या ड्रग्स प्रकरणात फसताना दिसतायेत.
The post ‘माझ्यासमोर घेतले होते सुशांतने ड्रग्ज’, या अभिनेत्रीने केला खुलासा appeared first on Dainik Prabhat.

‘माझ्यासमोर घेतले होते सुशांतने ड्रग्ज’, या अभिनेत्रीने केला खुलासा

Previous article

अमेरिकेत मायक्रोसॉफ्टला मागे टाकून ओरॅकलने मिळवले टिकटॉक

Next article

You may also like

Comments

Comments are closed.