Royal Entertainmentटॉप पोस्ट

Sanju Movie Review : खलनायक नहीं नायक हू मैं

0

संजय दत्तची आत्मकथा आणि त्यावर आधारित संजू सिनेमा. अभिनेता, मुलगा, मित्र अशा वेगवेगळ्या रुपांमध्ये आपल्याला संजय दत्त पाहायला मिळतो. वेगवेगळी रुप तशीच वेगवेगळी काम. संजय दत्त व्यसनात कसा आडकतो, त्यातून बाहेर येण्यासाठी कसा प्रयत्न करतो. त्याचा परिवार आणि मिळालेले मित्र यापासून कथेची सुरूवात होते. मिडियांच्या बातम्यांमुळे संजय दत्तची प्रतिमा कशी खराब होते. अशा प्रकारच्या सुरेख कथानकाची मांडणी करण्यात दिग्दर्शक राजकुमार हिराणी पुर्णपणे यशस्वी झालेले दिसतात.

संजय दत्तच्या पहिल्या चित्रपटापासून ते आतापर्यंतचा काळ पडद्यावर उभा करण्यासाठी दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत दिसून येते. दिसण्यापासून ते बोलण्यापर्यंत रणबीर कपूरने संजय दत्त उत्तम साकारलेला आहे. विकी कौशल, परेश रावल, दिया मिर्झा , मनिषा कोईरला आणि सोनम कपूर अशा सर्वांचा अभियनय कौतुकास्पद आहे.

Loading...

संजय दत्तला झालेली शिक्षा ही सर्वांना माहिती असली तरी, त्या मागील कारणे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणार कथानक या मुळे प्रेक्षक शेवट पर्यंत गुंतून राहतात.’कर हर मैदान फते’ हे गाणं प्रेक्षकांच्या भावनेला हात घालते. अभियनाप्रमाणेच चित्रपटाचे संगीत ही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहते.

संजय दत्तवर पडलेला आंतकवाद्याचा ठपका याकडे दुर्लक्ष करून त्याने तरूण वयात केलेली मजा पाहताना, आजची तरूणाई टाळ्या नक्की वाजवते. मात्र हे सर्व फक्त मनोरंजन म्हणुनच पाहायला योग्य वाटते कारण वास्तवात जाणकारांना सिनेमाविषयी पडलेले अनेक प्रश्न सिनेमा पाहिल्यानंतर मात्र अनुत्तरित राहतात. म्हणून कोणताही भुतकाळ न पाहता, फक्त मनोरंजन म्हणून या सिनेमाकडे पाहणे योग्य ठरेल.

रेटिंग – 3.5/5

दिग्दर्शक -राजकुमार हिराणी

कलाकार – रणबीर कपूर, परेश रावल, विकी कौशल, मनिषा कोईराला, दिया मिर्झा, सोनम कपूर, अनुष्का शर्मा

निर्माता – राजकुमार हिराणा, विदू विनोद चोप्रा

 

Loading...

मुंबईत रहिवासी भागात चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू

Previous article

मराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार; उच्च न्यायलयात मराठा आरक्षणाबाबत सुनावणी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *