मुख्य बातम्या

कॅन्सरशी लढा सुरु असतानाच संजय दत्तचा मोठा निर्णय

0

काही दिवसांपूर्वीच अभिनेता संजय दत्त याचा फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. सोशल मीडिच्याच्या माध्यमातून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ज्यानंतर खुद्द संजुबाबानं एक पोस्ट लिहित आपण कामाच्या व्यापातून काही काळासाठी विश्रांती घेणार असल्याचं चाहत्यांना आणि सर्वांनाच सांगितलं.
कॅन्सरचं निदान झाल्यानंतर संजय दत्तवर तातडीनं उपचार सुरु करण्यात आले. त्याच्या केमोथेरेपीचं पहिलं सत्र पूर्णही झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्यानंतरसआता संजय दत्त कलेवरील त्याचं प्रेम आणि कामाप्रती असणारी समर्पकता यांच्यापोटी एका महत्त्वाच्या निर्णय़ावर पोहोचला आहे.
आजारपणामुळं चित्रपटांची कामं अडू नयेत यासाठी आता त्यानं चित्रीकरण पुन्हा सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कॅन्सरशी संघर्ष सुरु असतानाच संजयचा हा निर्णय अनेकांना भुवया उंचावायला भाग पाडत आहे. तर, कित्येकजण त्याच्या पाठीवर थाप मारत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार संजय दत्तनं फक्त हा निर्णयच घेतला नाही, तर तो चित्रीकरणासाठी चित्रपटाच्या सेटवरही पोहोचला होता. दोन दिवसांच्या चित्रीकरणानंतर तो पुन्हा एकदा उपचारांकडे वळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
आरेच्या महत्वाच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड म्हणतात, ‘आम्ही….
उद्धव साहेब आतातरी घराबाहेर पडा, नगरसेवक गाड्या फोडतात आता नागरिक देखील फोडतील…

डरने वाले बाप का डरा हुआ बेटा हूँ ; ठाकरे पिता-पुत्रांवर राणेंचा जोरदार प्रहार

रोहित पवारांना कॅलक्युलेशन जमत नाही अभ्यास करुन बोलावं ; फडणवीसांचा टोला

सेनेचा राष्ट्रवादीला पुन्हा दणका ; संजय जाधव यांच्या राजीनामा नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कॅन्सरशी लढा सुरु असतानाच संजय दत्तचा मोठा निर्णय InShorts Marathi.

अजित दादांच्या पायगुणामुळेच आमची सत्ता गेली ; भाजपचा खोचक टोला

Previous article

कोल्हापुरात शुक्रवारपासून जनता कर्फ्यु लागू होण्याची शक्यता

Next article

You may also like

Comments

Comments are closed.