मुख्य बातम्या

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंची मोदींकडे ‘ही’ मागणी

0

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा पत्र लिहिलं आहे. या दोन्ही पत्रातून संभाजीराजेंनी पंतप्रधान मोदींकडून भेटीसाठी वेळ मागितली आहे. मात्र अद्याप संभाजीराजेंना मोदींनी भेटीसाठी वेळ दिलेली नाही.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली 20 पेक्षा जास्त पक्षांच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींकडून भेटीची वेळ मागितली आहे. मात्र अद्याप मोदींनी खासदारांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ दिलेली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकार गंभीर दिसत नसल्याची टीका केली जात आहे.
नुकतंच संभाजीराजे यांनी मोदींना पत्र लिहित पुन्हा एका भेटीची मागणी केली आहे. मात्र दोन वेळा पत्र लिहिल्यानतंरही त्यांना याबाबत काही प्रत्युत्तर मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-

राजकीय खळबळ : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?
शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच ; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
“राज्याच्या हितासाठी मोदी सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”
मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत
महत्वाचे : राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंची मोदींकडे ‘ही’ मागणी InShorts Marathi.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल जयंत पाटील म्हणतात….

Previous article

दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली तरी खडसे भाजप सोडून जाऊ शकत नाही – सुधीर मुनगंटीवार

Next article

You may also like

Comments

Comments are closed.