Royal politicsमुख्य बातम्या

भाजपने कितीही चेटूकगिरी केली तरीही राफेलचे भूत इतक्यात खतम होईल असे वाटत नाही : सामना

0

राफेल करारामुळे भाजप सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यातच भर म्हणून सुप्रीम कोर्टाने राफेल खरेदी नक्की कशी झाली याची माहिती सरकारकडून मागवली आहे,याच मुद्द्याला धरून सत्तेत असलेल्या शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून “आता काय लपवणार” असे म्हणत थेट मोदी सरकारवर अग्रलेखाचा बाण सोडला आहे.

राहुल गांधी जी माहिती मागत होते, तीच माहिती आता सुप्रीम कोर्टाने मागितली आहे. हवाई दलासाठी फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय कशा पद्धतीने घेण्यात आला याची माहिती केंद्र सरकारने बंद लिफाफ्यात द्यावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.

आता सरकार काय करणार आहे?

Loading...

आता सरकार काय करणार असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे, कारण राहुल गांधी जी माहिती उघड करा अशी मागणी करीत आहेत. आता सुप्रीम कोर्टाने तीच माहिती बंद लिफाफ्यात सरकारकडे मागितली आहे.

राफेलचे भूत मोदी सरकारच्या चांगलेच मानगुटीवर बसले आहे. भाजप किंवा सरकारच्या प्रवक्त्यांनी कितीही जंतर मंतर किंवा चेटूकगिरी केली तरी हे भूत इतक्यात खतम होईल असे वाटत नाही, अशा प्रकारची टिका सामनातून करण्यात आली आहे.


हे ही वाचा- 

पाकिस्तानात भाषा कधीच बदलत नाही; मात्र दक्षिण भारतात गेलात तर तुम्हाला त्यांची भाषा शिकावी लागते- नवजोत सिंग सिद्धू


#MeToo :- लैंगिक शोषणाच्या आरोपांची तपासणी करण्यासाठी समितीची नेमणूक करणार- मेनका गांधी


 

Loading...

#MeToo : लैगिंक शोषणाचे आरोप-प्रत्यारोप आणि वास्तव

Previous article

वैद्यकिय महाविद्यालय तसेच वैद्यकीय शिक्षणविभागाविरोधात मनविसेची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *