Royal Entertainmentमुख्य बातम्या

साई बाबांच्या या ५ गोष्टी ऐकल्या तर तुमचे नशीब बदलायला वेळ लागणार नाही

0

साईबाबांनी आपले संपूर्ण जीवन एखाद्या फकिराप्रमाणे घालवलेत. आपले कर्म तसेच चमत्कांनी त्यांनी नेहमीच लोकांची मदतच केली. तसेच त्यांच्या प्रत्येक संकटात ते उभे राहिले. साईबाबांनी कधीही आपल्या भक्तांना त्यांची पुजा करा असे सांगितले नाही मात्र त्यांना केवळ भक्तांकडून प्रेम हवे असे.
मनात प्रेम आणि दया असेल तर ईश्वराची कृपादृष्टी नेहमी राहते अशी शिकवण ते आपल्या भक्तांना देत. जर त्यांनी सांगितलेल्या ५ गोष्टी मनुष्याने आचरणात आणल्या तर नक्कीच त्याचे नशीब उजळेल. साई बाबांनी एका माणसाला कसे असले पाहिजे याबाबत सांगितले आहे. त्यांचे म्हणणे होते की जेव्हा आपण घर बनवतो तेव्हा त्याचा पाया मजबूत बनवतो.
ज्यामुळे घर वर्षानुवर्षे टिकले पाहिजे तसेच नैसर्गिक आपत्तीचा कोणताही परिणाम त्याच्यावर होऊ नये. हाच नियम माणसालाही लाग होतो. एका माणसाचे संगोपन असे झाले पाहिजे की तो आपल्या तत्वांवर आणि सिद्धांतांवर नेहमी ठाम असला पाहिजे. कोणीतरी काहीतरी सांगितले याचा परिणाम त्या व्यक्तीवर होता कामा नये.
साईबाबा म्हणतात मनुष्याला कमळाप्रमाणे असले पाहिजे. जसे कमळ सूर्याची किरणे पडताच खुलू लागते आणि त्याच्या पाकळ्या उघडतात. त्याचप्रमाणे एखाद्या मनुष्याला जेथून ज्ञान आणि चांगली शिकवण मिळत असेल तेथे कमळाप्रमाणे असायला हवे. ज्ञान मिळवण्यासाठी कोणाही समोर हात पुढे करता आला पाहिजे. ज्ञानानेच जीवनात एक नव्हे तर अनेक रस्ते उघडतात.
साईबाबा आपल्या भक्तांना नेहमी सांगत की जगात काय नवीन आहे? काहीच नाही आणि जगात काय जुने आहे? काहीच नाही. सगळं काही आहे आणि नेहमी राहील. मात्र धैर्य आणि संतुष्टपणा नसेल तर मनुष्यासाठी प्रत्येक दिवस त्रासदायक ठरू शकतो.
साईबाबा भक्तांना नेहमी अनुभवातून शिकवण घेण्यास सांगतात. तसेच ते हे ही सांगतात दुसऱ्याच्या अनुभवावरूनही शिकले पाहिजे. कारण अनुभव एक ज्ञान आहे आणि अनुभवाच्या आधारावर अध्यात्मचा मार्ग मोकळा होतो. मनुष्य अनुभवाच्या माध्यमातून शिकतो आणि आध्यामिक रस्ता विविध प्रकारच्या अनुभवांनी भरलेला आहे.
मनुष्य करत असलेला सर्व कर्मे ही विचारांचे परिणाम असतात. जर कोणी वाईट काम करत असेल तर हे त्याच्या विचारांचेच फळ आहे. तसेच जर कोणी चांगले कर्म करत असेल तर तेही त्याच्या चांगल्या विचाराचा परिणाम आहे. त्यामुळे आपले विचार आणि आचरण मनुष्याने शुद्ध ठेवले पाहिजे.
साईबाबांचे हे विचार मनुष्याला जीवनात प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणारे आहेत. हे पाच मूल मंत्र नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post साई बाबांच्या या ५ गोष्टी ऐकल्या तर तुमचे नशीब बदलायला वेळ लागणार नाही appeared first on Marathi Entertainment.

या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांनी आपल्या फॅन्स सोबतच केले होते लग्न, या सुपरहिट अभिनेत्रीने तर…

Previous article

जेलमधून बाहेर पडताच अभिनेत्री रिया चक्रवर्ती घेतला बदला, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.