Royal EntertainmentRoyal politicsटॉप पोस्ट

Sacred Games:- संवादासाठी कलाकार जबाबदार नाहीत- उच्च न्यायालय; कॉंग्रेसकडून याचिका मागे

0

‘सेक्रेड गेम्स’ ही नेटफ्लिक्सवरील वेब सीरिज राजकीय कारणाने  वादात सापडली आहे. या वेब सीरिजविरोधात दिल्ली उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. या वेब सीरिजमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आज (सोमवारी) दिल्ली उच्च न्यायलयात यावर सुनावणी करण्यात आली.

पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे कार्यकर्ते राजीव सिन्हा यांनी ‘सेक्रेड गेम्स’ विरोधात याचिका दाखल केली होती. जी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बद्दल वापरण्यात आलेल्या  आपत्तिजनक संवादा विरोधात होती.

Loading...

नवाजुद्दीन सिद्दीकी या मालिकेत मुंबईतील एका गँगस्टरची भूमिका साकारत आहेत. शाह बानो बेगम खटल्याचा उल्लेख असलेल्या एका दृशात शाह बानो बेगम यांना पाठिंबा न दिल्याबद्दल राजीव गांधींना “फट्टू” म्हटले आहे. शाह बानो प्रकरणातून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी रामायण या मालिकेचे टीव्ही वर प्रसारण करण्याचे आदेश दिले होते. असे देखील या दृशातील संवाद आहेत.

वेब सीरिजमध्ये प्रयोग करण्यात आलेले संवाद याला अभिनेता  जबाबदार नसल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. अशी याचिका न्यायलयात कशी टिकू शकेल असे विचारात न्यायालयाने असे मत मांडले की, याचिकाकर्त्यांनी मानहानी केल्याचा दावा केला आहे मात्र एखादं मत प्रदर्शित करण्यापासून आम्ही कोणाला कसे रोखू शखतो, ते प्रेक्षकांवरच सोडायला नको का? आणि जे भाग  झाले आहेत ते कसे काय थांबवणार?

आता पर्यंत या वेब सीरिजचे तब्बल 8 भाग नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाले आहेत, त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला.  परंतू या सीरिजचे आता कोणताही नवा भाग प्रदर्शित करू नये असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटनंतर राजीव सिन्हा यांनी घेतली याचिका मागे- 

भाजपा / राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  मते अभिव्यक्तीची स्वातंत्र्य निर्मनुष्य व नियंत्रित असणे आवश्यक आहे. माझ्या मते स्वातंत्र्य हे एक मूलभूत लोकशाही साठी योग्य आहे. माझ्या वडिलांचे भारताची सेवा करण्यासाठी जगले आणि सेवा करतानाच मरण पावले. वेब सीरिजमध्ये दिसणारी पात्र ही काल्पनिक आहेत. असे ट्विट केले.

परंतू कॉंग्रेस नेत्यांनी या वेब सीरिजला विरोध केला आहे.

Sacred Games Review:-

Sacred Games Review : God, Guns, Gory, It has everything to hook you up

Loading...

मंदिरांवर चर्चा करून रोजगार निर्माण होणार नाही:- सॅम पित्रोदा

Previous article

पश्चिम बंगाल:- मोदींच्या सभेत मंडप कोसळून 24 जण जखमी, जाणून घ्या काय आहे घटना

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *