Royal politicsमुख्य बातम्या

सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नको; भाजपने काढला मोर्चा

0

सबरीमाला मंदिरात कोणत्याही वयोगटाच्या स्त्रीयांनाला प्रवेश करता येईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजपने मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. यामुळे सोमवारी हजारो भाजप कार्यकर्त्यांनी तिरूअनंतपुरम येथे एकत्र येत न्यायालयाच्या निर्णया विरोधात मोर्चा काढला.

भगवान अयप्पाचा जयघोष करत महिला आणि लहान मुलांच्या समवेत राज्य सचिवालयावर मोर्चा काढला.

Loading...

गेली 800 वर्षापासून या मंदिरात 10 ते 50 वयोगटाच्या महिलांना प्रवेश नाकारण्यात आला होता. या विरोधात 2006 साली इंडियन यंग लाॅयर्स असोसिएशनने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता.

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात काढण्यात आलेल्या मोर्च्याचे नेते भाजपचे प्रदेश अध्यक्ष पी एस श्रीधरन पिल्लई यांनी संगितले की, आम्ही केरलमधील नागरिकांशी बोलून सबरीमाला मंदिर, मंदिराच्या पूर्वीपासूनच्या परंपरा, भगवान अयप्पाचे अनुयायीच्या संवेदनांची रक्षा करण्यासाठी व्यापक प्रमाणात आंदोलन छेडण्याची तयारी करणार आहोत.

मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने संगितले होते की आपण दिलेल्या निर्णयावर लगेचच पुनर्विचार करण्यात येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या 5 जणांच्या बेंच ने हा निर्णय 4:1 च्या बहुमताने दिला होता. त्यावेळी त्यांनी संगितले होते की, मंदिरात महिलांच्या येण्यावर बंधन लावणे हा लैंगिक भेदभाव आहे. ह्या परंपरा हिंदू महिलांच्या अधिकारचे उलंघन करतात.

मंदिरात प्रवेश करण्यासाठी या प्रथा आहेत – 

मंदिरात भाविकांना प्रवेश करण्यासाठी 41 दिवसांचा कठोर उपवास करावा लागतो. तसेच, मंदिरात येताना काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करावे लागतात. यात्रा पूर्ण होईपर्यंत दाढी करण्यास मनाई अशा प्रकारच्या अनेक प्रथा कराव्या लागतात.

मासिक पाळीमुळे होती मंदिरात जाण्यास बंदी – 

10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. लहान मुली व 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिला मंदिरात प्रवेश देण्यात येत असे. मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना मासिक माळीमुळे प्रवेश नाकारण्यात येत होता.


हे ही वाचा –

सबरीमाला मंदिर :- लिंगाच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही, मंदिरातील महिलांवरील प्रवेशबंदी हटवली

#MeToo :- कोणाला हवा होता किस ? चेतन भगतने केले स्पष्ट; केला ईमेल शेअर

Youth Olympic Games 2018: भारतीय संघाचे स्वप्न भंगले, सिल्वर मेडलवर मानावे लागले समाधान


 

Loading...

#MeToo :- कोणाला हवा होता किस ? चेतन भगतने केले स्पष्ट; केला ईमेल शेअर

Previous article

भाजपच्या वेबसाईटवर लिहिले ‘पाकिस्तान जिंदाबाद’, हॅकर्सचा पराक्रम

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *