मुख्य बातम्या

तृप्ती देसाई यांना सबरीमाला मंदिराप्रकरणी मोदींना भेटण्यापासून रोखले, पुणे पोलिसांकडून अटक

0

आज पंतप्रधान मोदी साईबाबा समाधी शताब्दी निम्मित शिर्डीला येणार आहेत. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई त्यांना भेटण्यासाठी शिर्डीला निघाल्या होत्या, परंतू त्या आधीची त्यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महिलांना सबरीमाला मंदिरात जाण्यापासून रोखले जात आहेत, त्या संदर्भात त्यांना पंतप्रधान मोदींची भेट घ्यायची होती.

गुरुवारी तृप्ती देसाई यांनी अहमदनगर पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून पंतप्रधान मोदींना शिर्डीत भेटण्याची मागणी केली होती, जर आपल्याला त्यांना भेटू दिले नाही, तर मोदींचा ताफा रोखण्याची धमकी त्यांनी दिली होती. या कारणाने पुणे पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Loading...

सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न – 

शिर्डी दौऱ्यादरम्यान मोदींची भेट घेऊन त्यांना जाब विचारण्यासाठी तृप्ती देसाई पुण्यातील त्यांच्या घरातून निघाल्या, परंतू घरातून निघतच त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.

आम्ही शिर्डीला निघालो होतो पण त्या आधीच पोलिसांनी आम्हाला अटक केली, पोलिसांकडून करण्यात आलेली अटक आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, आंदोलन करणे हा संविधानाने आम्हाला दिलेला हक्क आहे. सरकारकडून आमचा आवाज दाबण्यात येत आहे असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

शबरीमाला मंदिरात प्रवेश करु पाहणाऱ्या महिलांना रोखले जाते, मारहाण केली जाते. तिथे महिलांवर हात उचलणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल त्यांनी मिडियासमोर उपस्थित केला.

आम्हाला शबरीमाला मंदिरात जायचं आहे पण असे झाले तर तुमचे तुकडे करून महाराष्ट्रात पाठवू अशा धमक्या दिल्या जातात.

मोदी गप्प का ?

मोदी शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेणार आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखील महिला शबरीमाला मंदिरात का जाऊ शकत नाहीत? याबद्दल मोदी गप्प का? महिलांचे अच्छे दिन कधी येणार? असे सवाल देखील मिडियाशी बोलताना त्यांनी उपस्थित केले.

भाजप कार्यकर्त्यांचा सबरीमाला मंदिरात महिला प्रवेशाला विरोध – 

काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी केरळमधील सबरीमाला मंदिरासमोर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली, त्यात महिलांचा देखील समावेश होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश करता येईल असा निर्णय दिला होता.


हे ही वाचा – 

सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नको; भाजपने काढला मोर्चा

सबरीमाला मंदिर :- लिंगाच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही, मंदिरातील महिलांवरील प्रवेशबंदी हटवली

#MeToo मोहीम देशातील गंभीर मुद्यांकडून लक्ष विचलित करण्यासाठी, नाना पाटेकारांवर देखील दिली प्रतिक्रिया


 

Loading...

#MeToo मोहीम देशातील गंभीर मुद्यांकडून लक्ष विचलित करण्यासाठी, नाना पाटेकारांवर देखील दिली प्रतिक्रिया

Previous article

बदली केलेल्या पोलीस अधिकारी मिलिंद गायकवाड यांच्या समर्थनार्थ मनसेने पुण्यात काढला मूक मोर्चा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *