टॉप पोस्टमनोरंजनमहाराष्ट्रमुख्य बातम्या

नागराज मंजुळेंकडून पूरग्रस्तांना पाच लाख रुपयांची मदत

0

कोल्हापूर आणि सांगली शहरात पुरामुळे बरेच नुकसान झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यासाठी अनेक मराठी कलाकार पुढे सरसावले असून प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. मदत करणाऱ्यांच्या यादीत ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा सहभाग झाला आहे. मंजुळेंनी पूरग्रस्तांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा पाच लाखांचा चेक सोपवला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून नागराज मंजुळेंनी केलेल्या मदतीची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करताना लिहिलं आहे की, “नागराज मंजुळे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचे योगदान दिले. मी त्यांचा आभारी आहे!”.

Loading...

१ सप्टेंबरला भाजपची सर्वात मोठी ‘मेगा भरती’

Previous article

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये मला विरोधीपक्ष नेता दिसतोय’

Next article

You may also like

Comments

Comments are closed.