मुख्य बातम्या

मनसेच्या दणक्यामुळे खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 32 लाख रुपये रुग्णांना परत !

0

मनसेने आंदोलनाचा इशारा देताच रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलला महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी चांगलाच दणका दिला आहे. शहरातील खाजगी हॉस्पिटलांनी रुग्णांकडून कोरोना उपचाराच्या नावाखाली जादा आकारलेल्या बिलाचे पैसे रुग्णांना परत देण्यास सुरुवात केली आहे.
तब्बल 32 लाख रुपये हॉस्पिटलने परत केल्याचे समोर आले आहे. पी. के. सी हॉस्पिटल (वाशी), एम. पी. सी. टी हॉस्पिटल (सानपाडा), एम. जी. एम. हॉस्पिटल (बेलापूर), फोर्टिस हॉस्पिटल (वाशी), डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल (नेरुळ), रिलायन्स हॉस्पिटल (कोपरखैरणे), अपोलो हॉस्पिटल (बेलापूर), ग्लोबल हॉस्पिटल (वाशी), राजपाल हॉस्पिटल (कोपरखैरणे), तेरणा हॉस्पिटल (नेरुळ) तसेच सनशाईन हॉस्पिटल (नेरुळ) या हॉस्पिटलांनी रुग्णांकडून ज्यादा आकारलेले बिलाचे एकूण 32 लाख रुपये आतापर्यंत परत केले.
याबाबत महापालिकेने मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. तसेच कोव्हिड काळात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या आतापर्यंतच्या संपूर्ण बिलांची पडताळणी करण्यासाठी विशेष लेखा परीक्षण पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके सात दिवसांत हॉस्पिटलच्या बिलांच्या तक्रारीबाबत पडताळणी करुन जादा आकारलेल्या बिलांचे पैसे परत करणे, दोषी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करणे अथवा हॉस्पिटलची मान्यता निलंबित करण्याबाबतची आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने मनसेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या :-

चिंतेत वाढ करणारी बातमी ; देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर !
“उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर…” अयोध्येतील संतांकडून मुख्यमंत्र्यांना धमकी
संजय राऊतांनी मला उघड धमकी दिलीय ; कंगनाचा गंभीर आरोप
सूड बुद्धीने ठाकरे सरकार कंगनावर कारवाई करत आहे का ?
धनंजय मुंडेंनी घेतला कंगनाच्या वक्तव्याचा समाचार , म्हणतात..

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मनसेच्या दणक्यामुळे खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 32 लाख रुपये रुग्णांना परत ! InShorts Marathi.

पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर अन् पाकिस्तानसोबत टक्केवारी? भाजपचा सेनेवर हल्ला

Previous article

नाथाभाऊ तुमच्याकडचे ते व्हिडिओ व फोटो जनतेसमोर आणावेत – सचिन सावंत

Next article

You may also like

Comments

Comments are closed.