Royal Entertainmentटॉप पोस्ट

जगातला सर्वात महागडा शूज आहे विकायला, किंमत आहे तब्बल 1,23,26,05,000 रूपये

0

दुबईमधील चप्पलांचा लागलेला एक सेल सध्या भलताच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे कारणही तसे खासच आहे. या सेलमध्ये अनेक शूज विकण्यासाठी आहेत मात्र एका शुजची बनावट आणि किंमत एेकल्यावर आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. वेगवेगळ्या मिडिया रिपोर्टनुसार हा शूज सोने, रेशम आणि हिऱ्यांनी बनवला गेला आहे. तसेच याची किंमत 17 मिलियन डाॅलर म्हणजेच तब्बल 1,23,26,05,000 रूपये (123 करोड) एेवढी आहे.

या शूजचे वैशिष्टै म्हणजे हा शुज लेदरपासून बनवलेला असून, यावर सोन्याची प्लेटिंग करण्यात आली आहे. शूजच्या चारही बाजूला हिरे लावण्यात आलेले आहेत. तसेच दोन्ही शूजच्या वरच्या बाजूला मध्यभागी दोन मोठे हिरे लावण्यात आलेले आहेत. हे हिरे 15 कॅरेटचे असल्याचे सांगितले जात आहे.

View this post on Instagram

Diamonds, gold. The Passion Diamond Shoes.

A post shared by JADA DUBAI (@jadadubai) on

Loading...

या शूजला पलटियाल बुर्ज अल अरब हाॅटेलच्या टाॅप फ्लोरवर ठेवण्यात आले आहे. पॅशन ज्वेलर्सचे चीफ एग्जक्यूटिव हिमानी करमचंदानी यांचे म्हणणे आहे की, दुबई हे अरबपतींचे शहर आहे. या शहरात शूजला नक्कीच खरिदीदार मिळेल. तसेच ते म्हणाले की, पुढच्यावेळेस ते फक्त हिऱ्यांचा नाही, तर लाल मणी आणि नीलमणी लावलेले शूज बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.

या शूजला बनवण्याची आयडिया करमचंदानी यांना त्यांचे पार्टनर 26 वर्षीय मारिया-मजारी यांनी दिला होती.

या शूजचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या शूजच्या खरिदीदाराला लाईफ टाईम वाॅरंटी देखील मिळणार आहे. जर त्याने वापरणे सोडले तर हा शूज परत देखील करू शकणार आहे.

Loading...

तर मग कोर्टात जाईल :- महेश मांजरेकर

Previous article

या कारणामुळे अॅपलच्या सेल्स मॅनेजरला पोलीस कॉंस्टेबलने मारली गोळी, मॅनेजरचा मृत्यू

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *