मुख्य बातम्या

रोहित पवारांनी स्वत:हून कार्यकर्त्यांकडे मागितलं ‘हे’ बर्थ-डे गिफ्ट

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनर, बुके, केक यावर खर्च करण्यापेक्षा सध्याच्या संकटाच्या काळात सामाजिक भान जपण्याचं आवाहन रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:हून कार्यकर्त्यांकडे वाढदिवसाचं एक गिफ्ट मागितलं आहे.
फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करून रोहित पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानतानाच त्यांनी कार्यकर्त्यांकडे हक्कानं एक मागणी केली आहे. ते म्हणतात, ‘करोनाच्या संकटामुळं सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.
मात्र, अनेकांकडे ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. अशा मुलामुलींना मदत करता येईल का? त्यांच्यासाठी खर्च करता येईल का? गरजू विद्यार्थ्यांना स्मार्टफोन घेऊन देता येईल का? दहावी, बारावी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक शुल्काचा भार उचलता येईल का? याचा विचार करावा. काही कारणास्तव नैराश्य आलेल्या तरुणांना आधार देण्याचा विचार करावा.’असंही त्यांनी म्हटलं आहे.

माझा वाढदिवस उद्या असला तरी राज्यातील माझेमित्र, भाऊ-भगिनी व कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासूनच वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा करायला सुरुवात केलीय….. https://t.co/fxs7suZZmq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 28, 2020

 
महत्वाच्या बातम्या :-
ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असतानाच NCBचे प्रमुख दिल्लीला रवाना !
भाजपने बदनामी केली मग त्यांच्यासोबत परत कशाला जायचे ; राऊत-फडणवीस भेटीमुळे सेनेत नाराजीचे सूर
राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण ; वरिष्ठ नेत्यांसोबत घेतली होती बैठक
मोठी बातमी : “सगळेच आरक्षण रद्द करा आणि….” ; उदयनराजेंच खळबळजनक वक्तव्य
तिजोरीत खळखळाट झाल्याने नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या ; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. रोहित पवारांनी स्वत:हून कार्यकर्त्यांकडे मागितलं ‘हे’ बर्थ-डे गिफ्ट InShorts Marathi.

अरे व्वा ! नवरात्रीच्या दरम्यान ‘तारक मेहता का..’ मधील दयाबेन करणार कमबॅक !!

Previous article

चिंताजनक : देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ७४ हजार ७०३वर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.