टॉप पोस्टराजकारण

वेगवेगळ्या धर्माचे कारण सांगत पासपोर्ट देण्यास नकार, सुषमा स्वराज यांच्याकडून कारवाई

0

लखनऊ:-

तन्वी आणि तिचे पती असन सिद्धीकी हे दोघे पासपोर्ट कार्यालयामध्ये पासपोर्ट काढण्यासाठी गेले होते. परंतू पासपोर्ट कार्यालयामध्ये त्यांचा अर्ज नाकारण्यात आला, कारण ते वेगवेगळ्या धर्माचे होते.

Loading...

ही घटना उत्तरप्रदेशातील राजधानी लखनऊ येथील आहे. बुधवारी ही महिला आपला पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट अधिकाऱ्याकडे गेली असता, या अधिकाऱ्याने ती आणि तुझा पती हे वेगवेगळ्या धर्माचे असून पासपोर्टचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला आणि धर्माच्या नावावर अपमानित देखील केले.

यानंतर या दोघांनी पीएमओ आणि विदेश मंत्रालयाला ट्विट करून घेडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर विदेश मंत्रालायकडून याबाबत कडक कारवाई करण्यात आल्यानंतर या दोघांना पासपोर्ट उपलब्ध करून देण्यात आला. घडलेल्या घटनेबाबत मंत्रालयाकडून पासपोर्ट कार्यालयाकडून अहवाल मागवण्यात आला आहे.

नक्की काय झाले-

तन्वी यांनी आरोप केला आहे की, त्या पासपोर्ट काढण्यासाठी गेलेल्या पासपोर्ट कार्यालयात पहिली काही प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या पुढील प्रक्रियेसाठी पासपोर्ट अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर त्यांना धर्मावरून अपमानित करण्यात आले. तेथील अन्य काही कर्मचारी देखील त्यांची त्या अधिकार्‍यासोबत मस्करी करायला लागले. पुढे त्यांना मुस्लीम मुलासोबत लग्न केल्याबद्दल प्रश्न देखील विचारण्यात आले.

त्यांनी असा देखील आरोप केला की, या अधिकाऱ्यांनी त्यांना एकाच आडनाव ठेवा असा सल्ला देखील द्यायला सुरुवात केली.

या नंतर त्रास सहन न झाल्याने तन्वी यांनी घडलेल्या या दुर्दैवी घटनेबाबत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट करता माहिती दिली.

मंत्रालयाकडून कारवाई-

केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्यापर्यंत ट्विट पोहोचल्याचे समजल्यावर या अधिकाऱ्यांनी या दाम्पत्याला लेखी तक्रार देण्यासाठी सांगितले. परंतू प्रकरण आणखीनच तापल्यानंतर त्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आणि कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

यानंतर तन्वी आणि असन या दोघांना त्यांचे पासपोर्ट उपलब्ध करून देण्यात आले.

Loading...

डीएसके घोटाळ्यात वाढ, बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांना अटक

Previous article

Human Interest:- तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या प्रेमापोटी कधी आंदोलन केले आहे का? या विद्यार्थ्यांनी केले आहे जाणून घ्या का ?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *