टॉप पोस्ट

कर्ज महागणार; आरबीआय कडून रेपो रेट मध्ये वाढ

0

रिझर्व बँक ऑफ इंडिया ने या आर्थिक वर्षातील आपल्या पाहिल्याच पतधोरणात रेपो रेट आणि रिव्हर्स  रेपो रेट वाढ केली. रिझर्व बँककडून रेपो रेट मध्ये  वाढ करण्यात येऊन तो  ६ टक्क्यांवरून ६.२५  टक्के करण्यात आला आहे. ३ दिवस चलनविषयक धोरण समिती बरोबर चर्चा करून गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी रेपो रेट च्या दाराची घोषणा  केली.

पेट्रोल-डिझेल च्या सततच्या वाढी नंतर रेपो रेट च्या दरात होणारी वाढ ग्राहकांच्या खिश्याला कात्री लावणारी ठरली आहे. साडे चार वर्षानंतर रिझर्व बँक  ने व्याज दरात वाढ केली आहे.

Loading...

काय आहे रेपो रेट आणि त्याचे परिणाम?

रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून  देशातील बँकांना वित्त पुरवठा किंवा अल्प मुदतीचे कर्ज देण्यात येते. या कर्जावर आरबीआय कडून जे व्याज आकारले जाते; तो म्हणजे रेपो रेट. रेपो रेट मध्ये वाढ झाल्यास देशातील बँका आपले व्याज दर वाढवतात. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या क्रयशक्तीवर होतो, ग्राहक बाजारातून कमी वस्तू/सेवा विकत घेतात. ग्राहक बँकांमधून कमी कर्ज घेतात. परिणामी वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज महाग होतात.

काय आहे रिव्हर्स रेपो रेट आणि त्याचे परिणाम?

बँका आपल्याकडे असलेली अतिरिक्त रक्कम रिझर्व बँक कडे जमा करतात, त्या रक्कमेवर आरबीआय बँकांना ज्या दराने व्याज देते; तो व्याजदर म्हणजे रिव्हर्स रेपो रेट. बाजारातील अतिरिक्त पैसा नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआय हा  व्याजदर लागू करते. रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून  या आर्थिक वर्षातील पाहिल्याच पतधोरणात  रिव्हर्स  रेपो रेट  ६.५० टक्के  येवढा लागू करण्यात आला आहे.

आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी व्याजदर वाढवण्यात आल्याचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्याकडून सांगण्यात आले.

Loading...

व्हिडिओ | या पंतप्रधानाने केली चक्क वायपर घेऊन सफाई

Previous article

आतकंवादी संघटनांमध्ये भरती होणाऱ्या काश्मिरी तरूणांविषयी असलेला हा रिपोर्ट आश्चर्यकारक आहे

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *