Royal politicsटॉप पोस्ट

यूपीए-2 पेक्षा, मोदी सरकारच्या 4 वर्षाच्या कलावधीत झालेले बँकिंग घोटाळे 3 पट अधिक: आरबीआय

0

रिझर्व बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागील चार वर्षांमध्ये, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए -2 च्या पाच वर्षाच्या कारकिर्दीपेक्षा तीन पटीने जास्त कर्जाचे घोटाळे झाले आहेत.

अर्थतज्ञ आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसेंजीत बोस यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारांतर्गत रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून ही माहिती मिळाली आहे. या अंतर्गत RBI ने 2008-2009 ते 2017-2018 या काळात कर्जामध्ये झालेल्या घोटाळ्यांची माहिती दिली आहे. अशा प्रकारची कर्ज परकीय  बँका, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, लघु  वित्तीय बॅंका आणि इतर वित्तीय संस्थांकडून घेतले गेल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

 Year Number of loan fraudsTotal involved in lakh rupees.
 2008-0920661542080.09
 2009-102231128283.3
 2010-112393274022.7
 2011-121952355075.4
 2012-132086645524.4
 2013-141990841208.7
 2014-1522511712224
 2015-1621251736807
 2016-1723222056144
 2017-1824952246964
Loading...

(Source:Reserve bank of India)

बोस यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकारांतर्गत हा तक्ता RBI कडून पुरवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने  गेल्या चार वर्षात यूपीए-2 च्या 5 वर्षाच्या कलावधीत केलेल्या कर्ज घोटाळ्यांपेक्षा 55 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक जास्त घोटाळे झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अर्थतज्ञ आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बोस यांनी विचारले आहे की, तपास यंत्रणा कुठे आहे ?  किती घोटाळेबाजांना पकडण्यात आले आणि किती गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला?  बँकांची होणारी प्रचंड लूट आणि सार्वजनिक बँकिंग प्रणालीकडे होणारे दुर्लक्ष याला केंद्रीय वित्तमंत्री जबाबदार असल्याचे मत त्यांनी मांडले.

कर्ज घोटाळ्यातील 88% घोटाळे हे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील आहेत. आयआयएम- बंगलोर कडून करण्यात आलेल्या संशोधनात असे स्पष्ट होते की 2012 ते 2016 च्या कलावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 22 हजार 743 कोटीची रुपयांची फसवणूक झाल्याने मोठा फटका बसला आहे.

2018 हे बँकिंग क्षेत्रासाठी भयानक वर्ष ठरले आहे. देशातील 2 र्‍या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेला हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चौक्सी यांनी जवळपास 13 हजार कोटीचा गंडा घातला आहे. कानिष्क गोल्ड प्रायवेट लिमिटेड कडून 824.15 कोटी रुपयांच्या करण्यात आलेल्या फसवणुकीत भारतीय स्टेट बँक चा ही समावेश आहे.

 

Loading...

नितीश कुमार करणार बिहारमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचे नेतृत्व

Previous article

मी शेतकर्‍यांच्या पाठीशी; माझ्या ट्विटचा विपर्यास: रवीना टंडन

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *