Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

…तर आमचीही स्वबळाची तयारी : दानवे

0

टीम महाराष्ट्र देशा- मागील निवडणुकीत बरोबर असलेल्या घटक पक्षांना व समविचारी पक्षांना पुढील निवडणुकीत बरोबर घेऊनच निवडणुका लढण्याची आमची भूमिका आहे. बरोबर येण्यासाठी आमचे सर्वांनाच आमंत्रण आहे. शिवसेनेबाबत आमचा चांगला अनुभव असून, मंत्रिमंडळात सर्व निर्णय एकमतानेच घेतो. त्यांच्या मनात आमच्याविषयी द्वेष आहे, असे आम्हाला वाटत नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर योग्यवेळी शिवसेनेसह सर्व घटक पक्षांशी चर्चा होईल. याउपरही कोणाची स्वतंत्र भूमिका असेल, तर आमचीही स्वबळाची तयारी आहे, असे देखील त्यांनी  स्पष्ट केले आहे.

नगर येथे भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिका राजळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, अभय आगरकर आदी उपस्थित होते.

मोदींचा लघुपट शाळेत दाखवाच ; राज्य सरकारचा तुघलकी फतवा

Loading...

खा.उदयनराजे भोसले यांना महाराष्ट्र स्वाभिमान,रिपब्लिकन पक्षानंतर आता भाजपची ऑफर

Loading...

एमआयएम-भारिप युतीला शुभेच्छा : दानवे

Previous article

#MeToo : ‘संस्कारी’ आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप

Next article

You may also like

Comments

Comments are closed.