Royal politicsमुख्य बातम्या

युवा नेते रोहीत पवार व रविकांत तुपकर यांच्यात एक तास चर्चा

0
ravikant tupkar and rohit pawar

अकोला: (ता.१९ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा शरद पवार यांचे नातु रोहीत पवार व स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यात १८ फेब्रुवारी रोजी बुलडाण्यात एक तास बंदव्दार चर्चा झाली. या चर्चेतील माहीती बाहेर कळू शकली नसली तरी, आघाडीतील जागावाटप संदर्भातील बुलडाणा येथील लोकसभेच्या जागेवर चांगलीच खलबते झाल्याचे कळते.

या बाबत माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व शरद पवार यांचे नातु रोहीत पवार हे १८ फेब्रुवारी रोजी शहीद जवानांच्या नातेवाईकांच्या भेटीसाठी जिल्हयात आले होते. या भेटीनंतर रोहीत पवार हे बुलडाणा येथे आले असता काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी रोहित पवार व स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांची भेट झाली. जवळपास एक तास रोहित पवार व रविकांत तुपकर यांनी बंदव्दार चर्चा केल्याचे समजते. या चर्चेत आ. हर्षवर्धन सपकाळ सुध्दा सहभागी होते.

Loading...

कृषी विषयक बातम्या वाचण्यासाठी कृषीनामा या वेबसाईटला भेट द्या

रोहित पवार व रविकांत तुपकर चांगले मित्र सुध्दा आहेत, या निमित्ताने हे बुलडाणेकरांनाही कळले. सध्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतीम टप्प्यात आहे. बुलडाणा लोकसभेच्या जागेवरूनच आघाडी आणि स्वाभिमानीमध्ये जोरदार वाद सुरू आहे. बुलडाण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या असताना खा. राजू शेट्टी यांनी मात्र रविकांत तुपकरांसाठी बुलडाण्याच्या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यानुषंगाने आघाडीमध्ये बुलडाणा लोकसभेची जागा रविकांत तुपकरांना सुटण्याची दाट शक्यताही वर्तविल्या जात आहे. या पार्श्वभुमीवर उभय नेत्यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

या भेटीत रोहित पवारांनी रविकांत तुपकरांची मनधरणी केली काय ? यावरही तर्क काढल्या जात आहेत. या दोन युवा नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे बाहेर कळू शकले नाही. यासंदर्भात त्यांनी या विषयावार बोलणेही टाळले, मात्र एक तासाच्या या भेटीत बऱ्याच राजकीय चर्चा झाल्या, त्यात बुलडाणा लोकसभा मतदार संघावर बरेच खलबते झाल्याचे कळते. दरम्यान रोहीत पवार व रविकांत तुपकर यांच्या भेटीचे फोटो सोशल मिडीयावर व्हारल झाल्याने बुलडाण्याच्या राजकीय वर्तुळात या युवा नेत्यांच्या भेटीची चांगलीच चर्चा रंगत आहे.

Loading...

कश्मीर प्रश्नावर नगरमध्ये बुधवारी सहविचार सभेचे आयोजन

Previous article

प्रेक्षकही म्हणतायत ‘देअर यू आर’ भैयासाहेब ; वाचा किरण गायकवाड ते भैय्यासाहेब पर्यन्तचा प्रवास

Next article

You may also like

Comments

Comments are closed.