Royal Entertainmentटॉप पोस्ट

मी शेतकर्‍यांच्या पाठीशी; माझ्या ट्विटचा विपर्यास: रवीना टंडन

0

किमान आधारभूत किंमत, कर्जमाफी या मागण्या  घेऊन  शेतकरी रस्त्यांवर उतरले आहेत. महाराष्ट्रात आणि देशभरात चाललेल्या शेतकरी संपावर त्यात घडणार्‍य घटनांवर समाजमध्यमातून अनेक मतमतांतरे समोर आली आहेत.

बॉलीवुड अभिनेत्री  रवीना टंडन ने देखील शेतकरी संपावर ट्विट करून आपले मत मांडले. तिच्या या ट्विटवर  काही  नेटिझन्सने तिच्यावर टीका केली.

Loading...

नक्की ट्विट काय होते-

ही दुर्दैवी घटना आहे. आंदोलनाची ही पद्धत खूपच भयानक आहे. साहित्य,सार्वजनिक संपत्ती, वाहनांचे नुकसान करणे दुर्दैवी आहे. आंदोकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीन देखील देऊ नये. असे ट्विट रवीना टंडन कडून करण्यात आले होते.

 

काही वेळाने रवीना कडून हे ट्विट डिलीट करण्यातआले.

त्यानंतर तिने आणखी एक ट्विट करत आपल्या म्हणण्याचे स्पष्टीकरण दिले की, माझ्या ट्विट चा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी आंदोलकांना अन्न फेकू नये ते गरीबांना वाटावे अशी विनंती करीत होते. शेतमालाचे नुकसान करणार्‍या समाज कंटाकांना अटक करा असे माझे म्हणणे होते. मी नेहमीच शेतकर्‍यांच्या बाजूने आहे. त्यांच्या समस्या, अडचणी लवकर सुटाव्यात अशी मी कायमच प्रार्थना करीत असते.

(PHOTO INPUT:- FACEBOOK/RAVEENATANDON)

Loading...

यूपीए-2 पेक्षा, मोदी सरकारच्या 4 वर्षाच्या कलावधीत झालेले बँकिंग घोटाळे 3 पट अधिक: आरबीआय

Previous article

का करत आहेत अनेक राज्यातील शेतकरी आंदोलन ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *