Royal Entertainmentमुख्य बातम्या

श्रीखंडेराया या 7 राशींच्या जीवनात आनंद भरणार, नशिब देणार साथ, लवकरच आनंदाची बातमी मिळणार…

0

नमोमल्लारि देवाय भक्तानां प्रेमदायिने I
म्हाळसापतिं नमस्तुभ्यं मैरालाय नमोनमः II
मल्लारिं जगतान्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं I
मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् II
आज म्हाळसकांत श्रीखंडोबाची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत… मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ, धनु आणि मकर. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.
मेष : ग्रह म्हणतात की आज तुम्ही सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात प्रशंसनीय, अनुकरणीय व्हाल. नोकरी , व्यापार आणि व्यवसायात बढती, धनलाभ व नफ्याचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. आज आपण बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. आपल्या वाणीवर संयम ठेऊन गोड बोललं तर फायदा तुमचाच होईल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : आज ग्रह म्हणतात की आपला दिवस आनंदाने व्यतीत होईल. मानसिकदृष्ट्या आपण निरोगी राहाल. आपली कार्ये पूर्वनियोजित केल्याप्रमाणे पूर्ण होतील. आर्थिक फायद्याची शक्यता आहे. काही अपूर्ण कामे पूर्ण होतील. तुम्हाला संततीकडून आनंदची बातमी मिळेल आणि त्याचा फायदाही होईल. आजाराने पीडित लोकांचे आरोग्य सुधारेल. सहकाऱ्यां पासूनही फायदा होईल.
मिथुन : आपल्या जोडीदाराची आणि मुलांची विशेष काळजी घेण्यास ग्रह आपल्याला इशारा देत आहेत. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून किंवा बौद्धिक चर्चेपासून दूर रहा. आपला अपमान होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. पोट संबंधित आरोग्य समस्या त्रासदायक ठरू शकतात. नवीन कामाच्या सुरूवातीस अयशस्वी होण्याची शक्यता देखील आहे. आज प्रवास करण्याची योजना सुद्धा ठरवू नका.
कर्क : अपराधीपणामुळे तुमचे मन आज विचलित होईल असे ग्रह म्हणतात. आज आनंदीपणा, सौख्य आणि मनःशांती यांचा अभाव असेल. आज कुटुंबातील सदस्यांशी तुमचे वाद होण्याची शक्यता आहे. विनाकारण पैसा खर्च होईल आणि वेळेवर अपुरा देखील पडेल. जेवणाची वेळ टळेल. त्यामुळे अपचन, निद्रानाश होईल. छातीचे विकार उद्भवू शकतात. आध्यात्म, नामस्मरण यातून तारेल.
सिंह: ग्रहांच्या कृपेने आपला आजचा दिवस आनंदी व शांततामय असेल. आपल्या भावंडांशी नातेसंबंधात जवळीक वाढेल. आपल्याला त्यांचे सहकार्य देखील मिळेल. नातेसंबंधातील भावना किती खोलवर आहेत हे आपण समजू शकाल. एखाद्या रमणीय पर्यटन स्थळाची भेट आयोजित केली जाऊ शकते. आपण शारीरिक व मानसिकरित्या चिंतामुक्त रहाल. आर्थिक यशाची शक्यता आहे.
कन्या: कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल असे ग्रह म्हणतात. आपण आपले ठरविलेले कार्य मधाळ वक्तृत्वने पूर्ण करण्यास सक्षम असाल. आरोग्य चांगले राहील. ग्रह बौद्धिक चर्चेत न येण्याचा सल्ला देतात. आज कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत सहभोजन घ्याल. छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे, पण त्याचा खर्च वाया जाणार नाही, फायदाच होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात कष्ट घेतल्यास यश हमखास.
तुळ : आज आपण व्यवस्थित पद्धतीने आर्थिक नियोजन करून गुंतवणूक योजना बनवू शकाल असे ग्रह म्हणतात. आज आपली सर्जनशीलता आणि कार्यकुशलता बहरू शकते. तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी वाटेल. दृढ विचारांनी आपण कार्य पूर्ण करण्यास सक्षम असाल. आत्मविश्वास वाढेल. आनंद, मौजमजा आणि करमणुकीसाठी पैसा खर्च कराल.
वृश्चिक : आज ग्रह स्वभाव आणि बोलण्यावर संयम राखण्याचा सल्ला देत आहेत. आपले बिघडलेले शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक चिंतामुळे आपण विचलित व्हाल. वाहन चालवताना काळजी घ्या, अपघात योग बनले आहेत. शक्य असल्यास, खर्चिक औषधोपचार, ऑपरेशन इ. पुढे ढकला. मित्रपरिवार अथवा कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीच्या कामात सावधगिरी बाळगल्यास अनर्थ टाळले जातील. कारामणुकीवर खर्च होण्याची शक्यता आहे.
धनु: हा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, असे ग्रह म्हणतात. तुम्हाला आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रातही फायदा होण्याची शक्यता आहे. आज आपण मित्र व कुटूंबासमवेत पर्यटनस्थळी भेट दिल्यास मनाला आनंद होईल. व्यापार, व्यवसायातही हा दिवस फायदेशीर आहे. कुटुंबात शांतता व समाधान राहील. विवाह इच्छूकांना जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.
मकर : आज कुटुंब आणि मुलांच्या बाबतीत आपण आनंद तसेच समाधानाचा अनुभव घ्याल. आपण मित्र आणि प्रियजनांच्या भेटीमुळे आनंदित व्हाल. उधार वसुलीचे पैसे गोळा करण्यासाठी एखाद्या बाहेरगावी जाण्याची आवश्यकता भासेल पण तीही फायदेशीरच ठरेल. व्यवसाय क्षेत्रात संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढेल. उच्च अधिकाऱ्यांचा वरदहस्त तुमच्यावर राहील. नोकरी , व्यापारात आपली उन्नती होण्याची शक्यता आहे.
कुंभ: आज प्रतिस्पर्ध्यांशी वितंडवाद घालू नका असा सल्ला ग्रह देत आहेत. शारीरिक दृष्ट्या आजारी राहाल. जरा शिथिलता आणि आळशीपणा असेल. तरीही, आपण मानसिकदृष्ट्या मात्र आनंदी रहाल. व्यवसायात उच्च अधिकाऱ्यांसोबत काम करताना सावधगिरी बाळगा. मौजमजेसाठी आज पैसा खर्च होऊ शकतो. संततीबद्दल चिंता राहील. परदेशातून एखादी बातमी मिळेल.
मीन: आज ग्रह कोणत्याही अनैतिक कृतीत अडकू नये असा सल्ला देतात. राग आणि बोलण्यावर संयम ठेवा. आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. सरकार विरोधी प्रवृत्तींपासून दूर रहा. रोगांच्या उपचारांच्या साठी पैसे खर्च करण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्ट्या, आपण अस्वस्थ रहाल. नकारात्मकतेमुळे कुटुंबातील सदस्यांशी संबंध दुरावू नयेत याची काळजी घ्या. अध्यात्म आणि नामस्मरण तुम्हाला योग्य वाट दाखवेल.
शुभं भवतु: !
टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.
The post श्रीखंडेराया या 7 राशींच्या जीवनात आनंद भरणार, नशिब देणार साथ, लवकरच आनंदाची बातमी मिळणार… appeared first on STAR Marathi News.

आजची नवदुर्गामाता आहे माता ब्रह्मचरिणी, जाणून घ्या माता ब्रह्मचरिणी व्रतकथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

Previous article

तुमच्या आवडत्या सईचा IPLच्या या टीमला ‘फुल्ल सपोर्ट’

Next article

You may also like

Comments

Comments are closed.