मुख्य बातम्या

राफेल गेमचेंजर ठरणार नाही आणि चीनची चिंताही वाढणार नाही – शरद पवार

0

फ्रान्सहून रवाना झालेले पाच राफेल लढाऊ विमान आज (29 जुलै) भारताला मिळणार आहेत. सुमारे 7000 किमी प्रवास करुन राफेल विमानांची पहिली बॅच आज अंबालाच्या एअरफोर्स स्टेशन इथे पोहोचतील. राफेल विमान हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे.
लॉकडाऊनबाबत ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीत मतभेद आहेत का? ; शरद पवारांचे भन्नाट उत्तर
त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे राफेल लढाऊ विमानं ताफ्यात सामील होण्यानं भारतीस हवाई दलाची ताकद वाढणार आहे. मात्र राफेल विमान ताफ्यात सामील झाल्यानं हवाई दलाची ताकद वाढेल. पण राफेल गेमचेंजर ठरणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
कोरोनाच्या काळात फडणवीस आणि भाजपनं राजकारण करू नये-शरद पवार
शरद पवार सीएनएन न्यूज १८ दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाले की, भारतानं हवाई दलात राफेल विमानं सामिल केली ही नक्कीच चांगली बाब आहे. राफेलच्या ताफ्यात सामिल होण्यानं नक्कीच हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही. भारतानं ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमानं भारताला मिळाली आहेत. राफेलच्या हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होण्यानं चीनची चिंता वाढेल, असं वाटत नसल्याचं मत देखील शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

अजित पवार अॅक्शन मोडमध्ये ; पुणेकरांसाठी घेतला मोठा निर्णय @inshortsmarathi https://t.co/nayZziKKGW
— InShorts | मराठी (@InshortsMarathi) July 29, 2020

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राफेल गेमचेंजर ठरणार नाही आणि चीनची चिंताही वाढणार नाही – शरद पवार InShorts Marathi.

किशोरी शहाणे देतायत करोनाशी लढण्याचा कानमंत्र

Previous article

आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ मोठी गूड न्यूज

Next article

You may also like

Comments

Comments are closed.