Royal EntertainmentRoyal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

#MeToo : माझा ‘मीटू’शी कसलाही संबंध नाही : आठवले

0

पुणे : ‘मीटू’बाबत अनेक व्यक्तींवर आरोपी केले जात आहेत. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, ज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी तक्रार करण्याची आवश्यकता होती. केवळ एखाद्याला फसवण्यासाठी कोणीही याचा वापर करू नये. नाना पाटेकर, एम जे अकबर आणि इतर आरोप झालेले जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास माझा संबंध ‘मीटू’शी नाही, तर युट्यूबशी असल्याचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पुणे शहर यांच्या वतीने रामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन विश्रामग्रहात केले होते. यावेळी पत्रकार परिषदेत उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे, पक्षाचे कोषाध्यक्ष एम डी शेवाळे, महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव, राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी,चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष अशोक कांबळे, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, आयुब शेख, महेश शिंदे, महिपाल वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Loading...

भाजपचे चाळीस आमदार आणि सहा खासदार डेंजर झोनमध्ये असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता आठवले म्हणाले, त्या डेंजर झोनमधील मतदारसंघ सुरक्षित करण्याची जबाबदारी माझी असेल. बाळासाहेब आंबडेकर आणि एमआयएम यांच्या युतीची भीती नाही. कारण यांच्यापेक्षा अनेक पटीने माझ्या सभांना गर्दी होते. आंबेडकरांना टाळी देण्यासाठी मी नेहमीच तयार आहे. मात्र त्यांच्याकडून आवश्यक प्रतिसाद येत नाही. आबा बागुल चांगले काम करीत असून गेली ३० वर्षे काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून काम करीत आहेत. त्यांना उमेदवारी मिळायला हवी. तिकडे उमेदवारी मिळत नसेल, तर इकडे असे आमंत्रणही आठवले यांनी दिले.

Loading...

सेना-भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे : रामदास आठवले

Previous article

#MeToo :- कोणाला हवा होता किस ? चेतन भगतने केले स्पष्ट; केला ईमेल शेअर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.